लातूर (चाकूर) : सेवा पंधरवडा कार्यक्रमातील 450 रुग्णांना मोफत नंबरचे चष्मे वाटप
लातूर, 19 ऑक्टोबर, (हिं.स.)।लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे डॉ. गोविंदराव माकणे, कपिल माकणे व कपिलानंद प्रतिष्ठान आयोजित विविध सोहळ्यांचा कार्यक्रम पार पडला.यात सन्मान सोहळा, दिवाळी स्नेहमिलन तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवस
अ


लातूर, 19 ऑक्टोबर, (हिं.स.)।लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे डॉ. गोविंदराव माकणे, कपिल माकणे व कपिलानंद प्रतिष्ठान आयोजित विविध सोहळ्यांचा कार्यक्रम पार पडला.यात सन्मान सोहळा, दिवाळी स्नेहमिलन तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या सेवा पंधरवडा कार्यक्रमातील 450 रुग्णांना मोफत नंबरचे चष्मे वाटप आणि श्री.कपिलानंद प्रतिष्ठान संचालित ओम साई अन्नछत्र मंडळाचा दुसरा वर्धापन दिवस, असे विविध सोहळ्यांचा कार्यक्रम होता.

या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून सद्गुरु ह.भ.प.गहिनीय महाराज औसेकर, प्रा. मोतीपवळे बी.व्ही, कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती निळकंठ मिरकले, ऍड भारत चामे, उपाध्यक्ष वसंतराव डिगोळे, सज्जनकुमार लोणाळे, समाज कल्याणचे माजी सभापती रोहिदास वाघमारे, यांच्यासह सोसायटीचे सर्व संचालक, ओमप्रकाश अन्नछत्र मंडळाचे सर्व संचालक उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande