बीडहून मेमू व वंदे भारत ट्रेन सुरू करण्याची मागणी
बीड, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। बीड रेल्वे स्थानकातुन मेमू ट्रेन व वंदेभारत ट्रेन सुरु करण्याची मागणी मध्य रेल्वे चे सदस्य डॉ. आदित्य पतकराव यांनी मध्य रेल्वेचे व्यवस्थापका यांची भेट घेऊन केली. मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन मध्य
अ


बीड, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। बीड रेल्वे स्थानकातुन मेमू ट्रेन व वंदेभारत ट्रेन सुरु करण्याची मागणी मध्य रेल्वे चे सदस्य डॉ. आदित्य पतकराव यांनी मध्य रेल्वेचे व्यवस्थापका यांची भेट घेऊन केली. मध्य रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांची भेट घेऊन मध्य रेल्वे सदस्य डॉ. आदित्य पतकराव यांनी बीड जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले. या निवेदनामध्ये त्यांनी बीड स्थानकावरून मेमू ट्रेन तसेच वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची ठोस मागणी केली आहे.

डॉ. पतकराव यांनी दिलेल्या निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, बीड जिल्ह्यातील नागरिकांना डेमू ट्रेन सुरू झाल्यामुळे प्रारंभीक सुविधा मिळाल्या आहेत, परंतु प्रवाशांची वाढती संख्या आणि दैनंदिन प्रवास लक्षात घेता आता मेमू ट्रेनची नितांत आवश्यकता आहे. बीडहून पुणे, मुंबई, छत्रपती संभाजी नगर, लातूर, परभणी आणि नांदेड या मार्गांवर मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, कर्मचारी व सामान्य प्रवासी प्रवास करतात. मेमू ट्रेन सुरू झाल्यास त्यांच्या प्रवासात मोठी सोय होईल.

तसेच, बीडमधून वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव मांडताना डॉ. आदित्य पतकराव म्हणाले की बीडसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या जिल्ह्याला आधुनिक व उच्चगती रेल्वेसेवेशी जोडल्यास येथील आर्थिक, औद्योगिक आणि पर्यटन क्षेत्राला प्रचंड गती मिळेल. हा निर्णय 'विकसित भारत' या पंतप्रधानांच्या संकल्पाची पूर्तता करणारा ठरेल.

या आधीही डॉ. आदित्य यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे मुरुड रेल्वे स्टेशनवर ४ गाड्यांचे थांबे मंजूर झाले, ज्यामुळे स्थानिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला. तसेच त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे पुण्यातील ब्रिटिशकालीन अंडरपास रेल्वे पुलाचे कामही मार्गी लागले, ज्याची प्रतीक्षा अनेकवर्षांपासून होती.

त्यांच्या या उपक्रमांमुळे रेल्वे विभाग आणि स्थानिक नागरिकांमध्ये सकारात्मक संवाद व विकासाभिमुख दृष्टीकोन निर्माण झाला आहे.

डॉ. आदित्य पतकराव यांनी डीआरएम यांना विनंती केली की, बीड जिल्ह्याला मेमू ट्रेन आणि वंदे भारत एक्सप्रेसची सुविधा देऊन या भागाच्या प्रगतीला नवी गती द्यावी. अशी मागणी डॉ. आदित्य पतकराव यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande