दिवाळीत १३ हजार वाहनांची खरेदी
पुणे, 19 ऑक्टोबर (हिं.स.) दसऱ्या पाठोपाठ दिवाळीतही पुणेकरांनी नव्या वाहन खरेदीचा उत्साह कायम ठेवला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दिलेल्या माहितीनुसार, ८ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘आरटीओ’ कार्यालयात एकूण १३ हजार ३८७ नवीन वाहनांची नोंद झ
दिवाळीत १३ हजार वाहनांची खरेदी


पुणे, 19 ऑक्टोबर (हिं.स.)

दसऱ्या पाठोपाठ दिवाळीतही पुणेकरांनी नव्या वाहन खरेदीचा उत्साह कायम ठेवला आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) दिलेल्या माहितीनुसार, ८ ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘आरटीओ’ कार्यालयात एकूण १३ हजार ३८७ नवीन वाहनांची नोंद झाली असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एक हजार १५२ वाहनांची (सुमारे ९. ४ टक्क्यांनी) वाढ झाली आहे. त्यात दुचाकींची खरेदी वाढली असून, चार चाकी वाहनांची खरेदी मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीशी घटली आहे.

यामध्ये दुचाकी वाहनांची नोंदणी सर्वाधिक म्हणजे आठ हजार ७६३ इतकी झाली असून, गेल्या वर्षी ती सात हजार ९११ होती. मालवाहतूक वाहनांची नोंदणी ही ३६८ वरून ६३५ वर पोहोचली आहे. ऑटोरिक्षा या ५४६ इतक्या नोंदविल्या गेल्या आहेत. तसेच पर्यटन टॅक्सीच्या नोंदणीत दुपटीने वाढ होऊन, ती २१८ वरून ४७१ झाली आहे. दरम्यान, मागील वर्षा तीन हजार ११२ चारचाकी वाहनांची नोंदणी झाली होती. मात्र यंदा त्यामध्ये घट झाली असून, दोन हजार ७८६ चारचाकी वाहने नोंदणीकृत झाली आहेत. तसेच ४२ बस आणि १४४ इतर वाहनांची नोंद झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande