पुणे, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।
दिवाळीनिमित्त घराघरांत उत्सवाचे, आनंदाचे आणि जल्लोषाचे वातावरण आहे. घराघरांत लक्ष्मीपूजेची तयारी जोमात सुरू असून, बाजारपेठांमध्ये लक्ष्मीपूजेच्या साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरू असून आहे. मात्र या वर्षी पूजासाहित्याचे भाव काहीसे चढले आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा फुले, दिवे, अगरबत्त्या, रांगोळी आणि सजावटीच्या वस्तूंमध्ये ५ ते १० रुपयांची वाढ झाली आहे.
नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज आदी सण आता पुढील चार दिवसांत आहेत. त्यामुळे विविध प्रकारच्या पूजेसाठी ग्राहकांकडून पूजेच्या साहित्याला मागणी होते. दिवाळीसाठी शहर आणि उपनगरातील बाजारपेठांसह मध्य वस्तीतील विविध रस्त्यांवरही पूजेच्या साहित्याची विक्रेत्यांकडून विक्री होत आहे. दिवाळी पूजेसाठी हळदी-कुंकू, बदाम, खारीक, खोबरे, अगरबत्ती, धूप, विड्याची पाने, फुले, ऊसाची धाटे, झेंडूची फुले, नारळ, लक्ष्मी, तेल, तयार पणत्या, बोळकी, लक्ष्मीची पावले, रांगोळी, छोटी डायरी, पेन आदी साहित्याची आवश्यकता असते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु