राज्यातील रोजगारांबाबत गोखले संस्थेकडून अभ्यास
पुणे, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेतर्फे राज्यातील औद्योगिक क्षेत्रातील रोजगार लवचीकतेवर राज्यव्यापी अभ्यास सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासाद्वारे आर्थिक वाढीच्या तुलनेत, रोजगारांमध्ये किती बदल होतो, याचा अभ्यास क
राज्यातील रोजगारांबाबत गोखले संस्थेकडून अभ्यास


पुणे, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।

गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्थेतर्फे राज्यातील औद्योगिक क्षेत्रातील रोजगार लवचीकतेवर राज्यव्यापी अभ्यास सुरू करण्यात आला आहे.

या अभ्यासाद्वारे आर्थिक वाढीच्या तुलनेत, रोजगारांमध्ये किती बदल होतो, याचा अभ्यास करून सर्वसमावेशक धोरणनिर्मितीसाठी धोरणात्मक शिफारसी केल्या जाणार आहेत. गोखले संस्थेचे नवनियुक्त कुलगुरू डॉ. उमाकांत दाश यांनी ही माहिती दिली.

गेल्या काही महिन्यांत गोखले संस्था, तसेच मातृसंस्था हिंद सेवक संघ वादात सापडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर कुलगुरूपदी नियुक्त झालेल्या डॉ. दाश यांनी गोखले संस्थेला प्रगतीपथावर नेण्यासाठी नव्याने प्रयत्न सुरू केले आहेत. त्याअंतर्गत सामंजस्य करार, संशोधन प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. अर्थतज्ज्ञ असलेल्या डॉ. दाश यांनी यापूर्वी आणंद येथील इन्स्टिट्यूट ऑफ रुरल मॅनेजमेंटचे संचालक, तसेच अनेक संस्थांमध्ये काम केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande