लातूर : भीषण आगीत संपूर्ण सोयाबीनची बनीम जळून मोठ्या प्रमाणात नुकसान
लातूर, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। तिवटग्याळ ता. उदगीर येथील शेतकरी श्री. मनोहर सोपानराव पाटील यांच्या शेतात लागवड केलेल्या सोयाबीन पिकाच्या बनीमला अचानक लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण सोयाबीनची बनीम जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच
अ


लातूर, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।

तिवटग्याळ ता. उदगीर येथील शेतकरी श्री. मनोहर सोपानराव पाटील यांच्या शेतात लागवड केलेल्या सोयाबीन पिकाच्या बनीमला अचानक लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण सोयाबीनची बनीम जळून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ. आमदार संजय बनसोडे यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची स्वतः पाहणी केली.

या घटनेने मोहनराव यांच्या चेहऱ्यावर चिंता आणि हतबलता स्पष्टपणे दिसत होती. या आगीत झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला. तसेच शासन स्तरावरून व वैयक्तिक पातळीवर मदत मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी आमदारांनी दिले.

या प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत मार्गदर्शन देखील केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande