धंगेकर बिळातील उंदीर; जैन बोर्डिंगची जमीन हडपल्याचा आरोपावर मोहोळ यांचं प्रत्युत्तर
पुणे, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। पुण्यात जैन बोर्डिग हॉस्टेलच्या जागेची बेकायदेशीर विक्री केल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. या प्रकरणी थेट केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप होत आहे. यावर मोहोळ यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत खुलासा
mohol


पुणे, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।

पुण्यात जैन बोर्डिग हॉस्टेलच्या जागेची बेकायदेशीर विक्री केल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. या प्रकरणी थेट केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप होत आहे. यावर मोहोळ यांनी रविवारी पत्रकार परिषद घेत खुलासा केला. ते म्हणाले की, माझ्या गोखले कंपनीशी संबंध नाही. कंपनीतून मी २०२४ मध्येच बाहेर पडलो आहे. राजू शेट्टी यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे, ते नुराकुस्ती खेळताहेत, तर रविंद्र धंगेकर हे बिळातील उंदीर आहेत असा असा निशाणा साधला.

मुरलीधर मोहोळ म्हणाले की, राजू शेट्टी हे ज्येष्ठ नेते आहेत आरोप करण्याआधी त माझ्याशी संपर्क करायला हवा होता, त्यांनी माझ्यावर बेछूट आरोप केले अन् पुण्यातील बिळात लपलेले काही उंदीर बाहेर आहे असे रविंद्र धंगेकरांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला, मी प्रतिज्ञापत्रात सर्व सांगितले आहे, पुणेकरांच्या मनात शंका राहू नये म्हणून मी बोलत आहे, असे ते म्हणाले. रविंद्र धंगेकरांच्या आरोपावर बोलताना मोहोळ म्हणाले की, ते वैफल्यग्रस्त असून त्यांनी याआधीही आरोप केले पण ते पुरावे सादर करु शकले नाहीत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande