लातूर, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।मुस्लिम बांधवांना भाजपाची भीती दाखवून वर्षानुवर्ष काँग्रेसने मते घेतली सत्ता मिळवली मात्र समाजासाठी काहीच केले नाही.भाजपाच्या नेतृत्वातील केंद्र, राज्य शासनाबरोबरच रेणापूर नगरपंचायतीने कुठलाही जाती भेद न ठेवता विविध सर्वांगीण विकासाची कामे केलेल्या विकास कामांना साथ द्या भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे रहा असे आवाहन भाजपाचे नेते आ. रमेशआप्पा कराड यांनी केले.
रेणापूर नगरपंचायत अंतर्गत नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मुस्लिम बांधवांसाठी बांधण्यात येणाऱ्या 2 कोटी रुपये खर्चाच्या शादीखाना आणि 1 कोटी रुपये खर्चाच्या ईदगाह मैदानाच्या संरक्षण भिंत बांधकामाचे भूमिपूजन कराड यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी भाजपाचे किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ भोसले, रेणापूरचे प्रथम नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती,गोरगरीब सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी अनेक योजना सुरू केल्या.या योजनेचा असंख्य गोरगरीब आणि गरजू लाभार्थ्यांना लाभ मिळाला. योजनेचा लाभ देताना कधीच भेदभाव केला नाही असे सांगून यावेळी मुस्लिम बांधवांशी संवाद साधताना आ रमेशअप्पा कराड म्हणाले की, रेणापूर नगरपंचायत भाजपाच्या ताब्यात आल्यानंतर विविध कामासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी आणला. सिमेंट रस्ते, नाली बांधकाम, पाणीपुरवठा योजना रेणुकादेवी मंदिर परिसरात भक्त निवास, बालाजी मंदिर येथे भव्य सभागृह, सम्राट अशोक बौद्ध विहार, अहिल्यादेवी होळकर सभागृह यासह प्रत्येक समाज बांधवांचे हित आणि सोय लक्षात घेऊन अनेक विकासाची अनेक कामे केली कुठलाही भेदभाव केला नाही.त्यामुळे मुस्लिम बांधवांनी बुद्धिभेद करणाऱ्या पासून सावध रहून विकासाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असे बोलून दाखविले.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis