बीड, 19 ऑक्टोबर (हिं.स.)। “व्यवसाय हे केवळ उपजीविकेचे साधन नसून समाजात विश्वास निर्माण करणारे माध्यम आहे. नवे उपक्रम ग्रामीण भागातील युवकांना प्रेरणा देतील,” असे आमदार सुरेश धस यांनी आपल्या भाषणात सांगितले.
पाटोदा शहरातील व्यापारी जगतात नवा अध्याय लिहित, एका वस्त्रदालनाचे भव्य उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. या सोहळ्याला परिसरातील मान्यवर, व्यापारी वर्ग, ग्रामस्थ आणि युवा वर्गाची मोठी उपस्थिती लाभली.
या उद्घाटन सोहळ्यास माजी राज्य मंत्री तथा आमदार सुरेश आण्णा धस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले, ह.भ.प. रामकृष्ण रंधवे बापू आणि ह.भ.प. राधाताई महाराज सानप या मान्यवर संतांचा पवित्र आशीर्वाद सोहळ्याला लाभला.
संतवचनांच्या ओव्यातून ह.भ.प. प्रकाश महाराज बोधले यांनी प्रेक्षकांना समाजसेवा, प्रामाणिकपणा आणि श्रद्धेचे महत्त्व पटवून दिले. या उद्घाटन प्रसंगी परिसरातील व्यापारी, समाजसेवक, उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis