पुणे, 19 ऑक्टोबर (हिं.स.)।
राजकीय फायद्यासाठी जाती-धर्मात तेढ निर्माण करणे, हे संविधानविरोधी असून, देश आणि भावी पिढ्यांसाठी घातक आहे,’’ असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले कर्वेनगर येथे माजी नगरसेविका लक्ष्मी दुधाणे, स्वप्नील दुधाणे यांच्या पुढाकाराने व महापालिकेतर्फे उभारण्यात येत असलेल्या धनुर्विद्या क्रीडासंकुलाचे भूमिपूजन सुळे यांच्या हस्ते झाले. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, सचिन दोडके, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या की, विविधता हे भारताचे बलस्थान असून, समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात एकजुटीने लढा देणे आवश्यक आहे. राज्यातील आर्थिक स्थिती बिकट असून, शिवभोजन थाळी आणि लाडकी बहीण योजना अडचणीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील वाहतूक, पाणीपुरवठा आणि कचरा समस्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु