लातूर - रेणापूरात विकास कामांसाठी भाजपाला साथ देण्याचे आ.कराड यांचे आवाहन
लातूर, 19 ऑक्टोबर (हिं.स.) | रेणापूर नगरपंचायत भाजपाच्या ताब्यात आल्यानंतर विविध कामासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून आणला त्यातून अनेक विकासाची अनेक कामे केली, गेल्या 25 वर्षात जेवढी कामे झाली नाहीत तेवढी केवळ गेल्या पाच वर्षात झाली असून र
अ


लातूर, 19 ऑक्टोबर (हिं.स.) | रेणापूर नगरपंचायत भाजपाच्या ताब्यात आल्यानंतर विविध कामासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून आणला त्यातून अनेक विकासाची अनेक कामे केली, गेल्या 25 वर्षात जेवढी कामे झाली नाहीत तेवढी केवळ गेल्या पाच वर्षात झाली असून रेणापूरात मोठा विकासात्मक बदल घडून आला. येत्या काळात रेणापूर शहरातील विविध विकास कामासाठी पंधरा कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे तेव्हा येणाऱ्या काळात होणाऱ्या निवडणुकीत विकासाची कामे करणाऱ्या भाजपाला साथ द्या असे आवाहन भाजपाचे नेते आ. रमेश कराड यांनी केले आहे.

नगर विकास विभागाच्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून रेणापूर नगरपंचायत अंतर्गत असलेल्या मोजे हनुमंतवाडीतांडा येथे 50 लक्ष रुपये खर्चाच्या सभागृहाचे आणि हनुमंतवाडी येथे 30 लक्ष रुपये खर्चाच्या समशानभूमी बांधकामाचे भूमिपूजन लातूर ग्रामीणचे आमदार रमेशआप्पा कराड यांच्या हस्ते झाले. यावेळी त्या त्या भागातील नागरिकांशी संवाद साधला त्याचबरोबर रेणापूर येथे शहरातील विकास कामाच्या अनुषंगाने युवकाशी चर्चा केली.

याप्रसंगी भाजपाचे किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमकाका शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ भोसले, रेणापूरचे प्रथम नगराध्यक्ष अभिषेक आकनगिरे, मंडल अध्यक्ष महेंद्र गोडभरले, महेश गाडे यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.

हनुमंतवाडी आणि हनुमंत वाडी तांडा येथील नागरिकाबरोबरच रेणापूर येथे तरुणांशी संवाद साधताना आ. रमेश कराड म्हणाले की, रेनापुर नगरपंचायत भाजपाच्या ताब्यात आल्यापासून जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध विविध विकास कामांना गती दिली अनेक मंदिराचा जिर्णोद्धार करण्याचे भाग्य मला लाभले, निश्चितपणे सांगू शकतो गेली 25 वर्षापेक्षा भाजपाच्या नेतृत्वातील नगरपंचायतची पाच वर्ष सरस आहेत. अनेक कामे पूर्ण झाली आहेत, बरीच कामे प्रगतीपथावर आहेत आणि उर्वरित कामे येत्या काळात सुरू होतील माझ्या आमदारकीच्या कार्यकाळात रेनापुर शहराच्या विकासाचे कुठलेही काम शिल्लक राहणार नाही चार दिवस मागेपुढे होईल मात्र शिल्लक ठेवणार नाही असेही त्यांनी बोलून दाखविले.

रेणापूर येथे इनडोअर स्टेडियम करिता दोन कोटी आणि वाचनालयासाठी एक कोटी रुपये मंजूर केल्याबद्दल रेणापूर शहरातील तरुणांच्या वतीने वतीने आ रमेश कराड यांचा यथोचित सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.

-------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande