छत्रपती संभाजीनगर, 2 ऑक्टोबर (हिं.स.)। गिरिजामाता गड, म्हैसमाळ येथे राजपूत परदेशी समाजाचा दसरा मेळावा आज उत्साहात संपन्न झाला.
क्रांतीसुर्य महाराणा प्रताप सिंह प्रबोधन समिती दसरा मेळावा आयोजित केला.
या प्रसंगी कन्नड–सोयगाव मतदारसंघाचे माजी आमदार उदयसिंग राजपूत यांनी उपस्थित राहून समाज बांधवांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या.
माजी आमदार राजपूत यांच्या हस्ते
प्रतिमा पूजन व शस्त्र पूजन करून समाजाबद्दल आपुलकीची भावना व्यक्त केली.
समाज बांधवांनी दरवर्षी अशा मेळाव्याचे आयोजन व्हावे, ज्यामुळे समाजात एकतेची व प्रगतीची प्रेरणा जागी राहील, अशी भावना आमदार राजपूत यांनी केली.
समाजात एकतेची नवी उर्जा निर्माण झाली आणि समाजहितासाठी एकजुटीने कार्य करण्याचा संदेश दिला.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis