मुंबई, 2 ऑक्टोबर (हिं.स.)। राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव मनिषा वर्मा, यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव गोविंद साबने, सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे व निलेश गव्हाणकर यांच्यासह मंत्रालयीन अधिकारी- कर्मचारी यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर