लातूर, 2 ऑक्टोबर (हिं.स.)।
आज अहमदपूरमध्ये सिद्धी शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या आगामी २०२५-२६ ऊस गाळप हंगामाचा शुभारंभ बॉयलर अग्नीप्रदीपन सोहळ्याने मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी सहकारमंत्री बाबासाहेब पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते बॉयलरचे अग्नीप्रदीपन करण्यात आले.
साखर कारखान्यासाठी बॉयलर अग्नीप्रदीपन हा महत्त्वाचा आणि पारंपरिक सोहळा आहे. बॉयलर हे कारखान्याचे हृदय मानले जाते. या बॉयलर पूजनावेळी यंदाचा संपूर्ण हंगाम कोणताही अडथळा न येता यशस्वीपणे पार पडावा आणि कारखाना, कामगार व शेतकऱ्यांची भरभराट व्हावी, अशी यावेळी बाबासाहेब पाटील साहेबांनी प्रार्थना केली.
या कार्यक्रमास माजी राज्यमंत्री बाळासाहेब जाधव, भागवताचार्य कृष्णा महाराज धानोरकर, माजी सरपंच साहेबराव जाधव, व्यवस्थापकीय संचालक अविनाश भैया जाधव, सिद्धी शुगरचे व्हाईस प्रेसिडेंट पी जी होनराव, अहमदपूरचे मुख्याधिकारी संतोष लोमटे, तसेच कारखान्याचे संचालक, चेअरमन, सदस्य, कामगार आणि शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते.
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis