इस्लामाबाद , 2 ऑक्टोबर (हिं.स.)।पीओकेमध्ये सरकारविरुद्ध हिंसक निदर्शने सुरूच आहेत. निदर्शने शांत करण्यासाठी सुरक्षा दलांनी बुधवारी निशस्त्र लोकांवर गोळीबार केला, ज्यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला आणि १०० हून अधिक जण जखमी झाले.तर तीन पोलीस अधिकारी ठार झाले. बुधवारी रात्रीही आंदोलन सुरूच होते. स्थानिक मीडियाने ही माहिती बुधवारी दिली.
जम्मू आणि काश्मीर संयुक्त अवामी कृती समिती (जेकेजेएएसी) च्या आदेशावरून हे निदर्शने केली जात आहेत. निदर्शक सरकारवर मूलभूत हक्कांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आणि महागाई नियंत्रित करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करतात. संपाच्या दरम्यान विरोधी गटांनी एकत्र येऊन आंदोलने केली आणि एकमेकांवर शांततामय आंदोलनादरम्यान हिंसा भडकावल्याचा आरोप केला. या आंदोलनांदरम्यान झालेल्या हिंसक झटापटीत तीन पोलीस अधिकारी ठार झाले आणि 100 हून अधिक लोक जखमी झाले. सर्व जखमी पोलीसच आहेत की काही सामान्य नागरिकही आहेत, हे स्पष्ट झालेलं नाही.
अवामी अॅक्शन कमिटीचे ज्येष्ठ नेते शौकत नवाज मीर यांनी यावेळी थेट इस्लामाबाद आणि पाकिस्तानी सैन्यावर हल्ला चढवला आहे. मीर म्हणाले की, पाकिस्तान सरकार आणि लष्कर स्थानिक लोकांचा आवाज दाबत आहे आणि सामान्य जनतेवर अत्याचार करत आहे. त्यांनी लष्कराची तुलना ‘अशा जादूटोण्याशी केली जी लोकांचे प्राण घेण्यास निघाली आहे.’ मीर यांचे म्हणणे आहे की सत्तेत असलेले लोक फक्त श्रीमंत आणि विशिष्ट वर्गाचाच फायदा पाहतात, तर सामान्य काश्मीरी सतत दबाव आणि दडपशाही सहन करत आहे. त्यांनी हेही लक्षात आणून दिलं की अलीकडे पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आधी हिंदूंना ‘काफिर’ म्हटलं होतं. मीर यांनी या विधानाला पाकिस्तानच्या दुटप्पी वृत्तीचं उदाहरण ठरवलं.
जम्मू आणि काश्मीर संयुक्त अवामी अॅक्शन कमिटी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलनं तीव्र झाली आहेत. आंदोलकांच्या प्रमुख मागण्या आहेत. यामध्ये भ्रष्टाचारावर नियंत्रण आणि लष्कराच्या अत्याचारांचा अंत. या संघटनेने सरकारला 38 सूत्री मागणीपत्रही सादर केलं आहे, ज्यामध्ये नेते आणि अधिकाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या खास सुविधा बंद करण्याची मागणी आहे. पाकिस्तान सरकारने पत्रकार आणि पर्यटकांना पीओकेमध्ये प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. स्थानिक पत्रकारही असा आरोप करत आहेत की त्यांना तटस्थ कव्हरेज देण्यापासून रोखले जात आहे. अनेक मानवाधिकार संघटना देखील या मुद्द्यावर आवाज उठवत आहेत.
लोकांचा आवाज दाबण्यासाठी पीओके प्रशासनाने संपूर्ण भागात अनिश्चित काळासाठी लॉकडाऊन लावला आहे. मोबाईल आणि इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या आहेत. परिस्थिती इतकी तणावपूर्ण आहे की, सुरक्षा दलांवर शांततामय आंदोलकांवर गोळीबार केल्याचे आरोप झाले आहेत. यामुळे जनतेचा संताप आणखीनच वाढला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode