भारताचे नाव घेऊन पाकिस्तानचा जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न
इस्लामाबाद, 2 ऑक्टोबर (हिं.स.)। पाकव्याप्त काश्मीरमध्ये शहबाज सरकार विरोधातील आंदोलनं दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहेत. पाकिस्तान आर्मीचे प्रमुख आसिम मुनीर यांच्या अन्यायाविरोधात लोक रस्त्यावर उतरून हिंसक निदर्शने करत आहेत.सुरक्षा दलांनी निदर्शकांवर ग
पाकिस्तान सरकार


इस्लामाबाद, 2 ऑक्टोबर (हिं.स.)। पाकव्याप्त काश्मीरमध्ये शहबाज सरकार विरोधातील आंदोलनं दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहेत. पाकिस्तान आर्मीचे प्रमुख आसिम मुनीर यांच्या अन्यायाविरोधात लोक रस्त्यावर उतरून हिंसक निदर्शने करत आहेत.सुरक्षा दलांनी निदर्शकांवर गोळीबार केल्याने सुमारे 12 नागरिकांचा मृत्यू झाला आहे आणि त्यामुळे जनतेचा रोष इतका वाढला आहे की पाक सरकार आणि मुनीर यांच्या लष्कराची झोप उडाली आहे.पाकिस्तान सरकार स्वतःची अपयशं लपवण्यासाठी आता भारताचे नाव घेऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे.

पाक लष्कर सामान्य लोकांची आवाज दाबण्यासाठी धमकी आणि गोळीबाराचा वापर करत आहे. पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते अहमद शरीफ चौधरी यांनी निदर्शकांना थेट धमकी दिली आहे. त्यांनी म्हटले, “लोकांना निदर्शने करण्याचा अधिकार आहे, पण सरकार अस्थिर करण्याची मुभा दिली जाणार नाही.”

पीओकेमधील नागरिक अनेक वर्षांपासून पाक लष्कराच्या जुलूम सहन करत आहेत.सामान्य जनतेचा आरोप आहे की, सरकार इथे कुठलाही विकास करत नाही आणि महागाई अत्यंत वाढलेली आहे.

अहमद शरीफ चौधरी यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले की,

“पीओकेमध्ये सरकारचा यंत्रणा व्यवस्थित कार्यरत आहे. जर इथे कर वसूल केला गेला नाही, तर सरकार कर्मचाऱ्यांना पगार कसा देणार? जर निदर्शकांना काही अडचण असेल, तर त्यांनी व्यवस्था वापरून सरकारशी संवाद साधावा.”

आपले अपयश झाकण्यासाठी त्यांनी पुन्हा एकदा भारताचा उल्लेख करत म्हटले,“जे लोक काश्मीरचं स्वप्न पाहत आहेत, त्यांचा संबंध सुद्धा काश्मीरशीच आहे. आमच्या लष्करातील अनेक जवान काश्मीरमधूनच आलेले आहेत.”भारतातील जम्मू-काश्मीर आता विकासाच्या दृष्टीने खूप पुढे निघून गेला आहे, पण पाकिस्तानचे लष्कर आपल्या लोकांना खोटं समाधान देण्यासाठी खोट्या निवेदानांचा आधार घेत आहे.

अहमद शरीफ चौधरी यांनी दावा केला की, “पीओकेमध्ये महागाई नाही, सामान्य लोकांच्या हितासाठी अनेक कामं करण्यात आली आहेत. पीओकेची स्थिती भारताच्या जम्मू-काश्मीरपेक्षा चांगली आहे. इथली साक्षरता दर त्यांच्यापेक्षा जास्त आहे.” परंतु, मैदानात उतरलेली जनता आणि मृत्युमुखी पडलेले निष्पाप नागरिक हे वास्तव सांगत आहेत की, पाकिस्तान सरकार आणि लष्कर दोघेही पीओके मधील लोकांची मूलभूत गरजा पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande