छ. संभाजीनगर- संघ शताब्दी वर्षाच्या औचित्याने भव्य पथसंचलन
छत्रपती संभाजीनगर, 2 ऑक्टोबर (हिं.स.)विजयादशमी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षाच्या औचित्याने संत रोहिदास नगर शाखेच्या वतीने आयोध्या नगरी मैदान, पदमपुरा येथे भव्य पथसंचलन संपन्न झाले.भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या सह अनेक
अ


छत्रपती संभाजीनगर, 2 ऑक्टोबर (हिं.स.)विजयादशमी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दी वर्षाच्या औचित्याने संत रोहिदास नगर शाखेच्या वतीने आयोध्या नगरी मैदान, पदमपुरा येथे भव्य पथसंचलन संपन्न झाले.भारतीय जनता पक्षाचे खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक स्वयंसेवक म्हणून या पथसंचलनामध्ये सहभागी होण्याचे सौभाग्य लाभले. संघशक्तीचे, शिस्तीचे आणि मातृभूमीप्रति निष्ठेचे दर्शन घडवणाऱ्या या ऐतिहासिक क्षणाचा भाग होण्याचा अभिमान वाटतो.संघाची शताब्दी ही केवळ परंपरेचा उत्सव नसून ती राष्ट्रनिष्ठा, संस्कार व संघभावनेचा जागर आहे. या पथसंचलनातून राष्ट्रभक्तीचे प्रेरणादायी दर्शन घडले.

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande