नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर, (हिं.स.)।कॉमेडियन मुनावर फारूकी यांची हत्या करण्यासाठी सुपारी दिलेल्या रोहित गोदारा, गोल्डी बराड आणि वीरेंद्र चारण या टोळीच्या दोन आरोपींना पोलिसांनी गुरुवारी (3 ऑक्टोबर) सकाळी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्या दोघा आरोपींची ओळख राहुल आणि साहिल अशी झाली आहे. गुरुवारी (3 ऑक्टोबर) सकाळी जैतपूर-कालिंदी कुंज रोडवर झालेल्या चकमकीनंतर या दोघांना अटक करण्यात आली. हे दोघेही हरियाणाच्या पानीपत आणि भिवानी जिल्ह्यांचे रहिवासी आहेत.या दोघांना स्टँड-अप कॉमेडियन मुनावर फारूकी यांची हत्या करण्यासाठी सुपारी दिली गेली होती. मुनावर फारूकीने 2024 मध्ये रिअॅलिटी शो ‘बिग बॉस’ जिंकला होता.
तपास अधिकाऱ्यांच्या मते, या दोघा गुन्हेगारांना विदेशात राहणाऱ्या माफिया रोहित गोदाराकडून सूचना मिळत होत्या, जो गोल्डी बराड़ आणि वीरेंद्र चारण यांच्यासोबत मिळून मुनव्वर फारूकीच्या हत्येची योजना आखत होता. पोलिसांनी सांगितले की, मुंबई आणि बंगळुरूमध्ये मुनावर फारूकीवर नजर ठेवण्यासाठी त्याची गुप्तपणे हेरगिरी करण्यात आली.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, गोळी लागलेला आरोपी राहुल डिसेंबर 2024 मध्ये हरियाणाच्या यमुनानगरमध्ये घडलेल्या तिहेरी हत्याकांडप्रकरणी वांछित होता. त्याला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, चकमकीत वापरण्यात आलेली शस्त्रे आणि एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
दिल्ली पोलिसांनी माहिती दिली की, बुधवार आणि गुरुवारी दरम्यान रात्री साधारण 3 वाजता, एका बाईकवर येणारे दोन संशयित दिसले. त्यांना थांबवण्याचा इशारा दिला गेला, पण बाईकस्वार गुन्हेगारांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांच्या प्रत्युत्तरात दोघांच्या पायावर गोळ्या लागल्या, आणि त्यानंतर राहुल आणि साहिल या दोघांना अटक करण्यात आली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode