जळगाव, 20 ऑक्टोबर (हिं.स.)आज सोमवारी सोन्याच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. शिवाय चांदीच्या किमतीतही घसरण दिसून येत आहे. . जळगाव सुवर्णपेठेत सध्या सोन्याचे भाव एक लाख २८ हजार ५०० रुपयांवर पोहोचले आहे. तर चांदी एक लाख ७१ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. आगामी काळ तेजीचाच राहणार असल्याने गुंतवणुकीसाठी फायद्याचा ठरू शकतो, असे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
--------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर