विरारमध्ये पहिल्यांदाच घर मिळाल्याचा आनंद गोदरेज कॅपिटलने साजरा केला
विरार, 20 ऑक्टोबर (हिं.स.) : गोदरेज इंडस्ट्रीज समूहाच्या आर्थिक सेवा शाखेअंतर्गत कार्यरत असलेल्या गोदरेज कॅपिटलने आपल्या उपकंपनी गोदरेज हाऊसिंग फायनान्सच्या माध्यमातून ‘पक्का पता’ ही नवीन मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा उद्देश म्हणजे भारतातील उदय
लोगो


विरार, 20 ऑक्टोबर (हिं.स.) : गोदरेज इंडस्ट्रीज समूहाच्या आर्थिक सेवा शाखेअंतर्गत कार्यरत असलेल्या गोदरेज कॅपिटलने आपल्या उपकंपनी गोदरेज हाऊसिंग फायनान्सच्या माध्यमातून ‘पक्का पता’ ही नवीन मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचा उद्देश म्हणजे भारतातील उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये परवडणाऱ्या गृहकर्ज सुविधा उपलब्ध करून देणे आणि लोकांना त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करता यावे, यासाठी पाठबळ देणे.

ही मोहीम विशेषतः पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या भावनिक प्रवासावर लक्ष केंद्रित करते. भाड्याच्या घरातून स्वतःच्या मालकीच्या घरात स्थलांतर करण्याची प्रक्रिया ही केवळ आर्थिक नव्हे, तर भावनिकदृष्ट्याही अत्यंत महत्त्वाची असते. गोदरेज हाऊसिंग फायनान्स या प्रवासात विश्वासार्ह आणि सक्षम भागीदार म्हणून पुढे येत आहे.मोहीमेचा गाभा एका अत्यंत साध्या पण अर्थपूर्ण संकल्पनेभोवती फिरतो – ‘पक्का पता’, म्हणजेच कायमस्वरूपी पत्ता. ही संकल्पना भारतीय कुटुंबांसाठी केवळ एक घर नसून, स्थैर्य, अभिमान आणि स्वप्नपूर्तीचे प्रतीक आहे. या मोहिमेतील चित्रपटात एका कुटुंबाच्या त्यांच्या हक्काच्या घरात स्थलांतराच्या भावनिक प्रवासाचे सुंदर चित्रण केले आहे.

गोदरेज कॅपिटलचे मुख्य विपणन अधिकारी नलिन जैन म्हणाले,

घर खरेदी हा केवळ आर्थिक निर्णय नसून एक भावनिक टप्पा आहे. 'पक्का पता' हा तो क्षण असतो, जेव्हा स्वप्न सत्यात उतरते. भाड्याची जागा जेव्हा स्वतःचे घर होते, तेव्हा स्थैर्य, आत्मविश्वास आणि अभिमान यांची सुरुवात होते. आमच्या सुलभ कर्ज प्रक्रियेद्वारे, घराच्या एकूण किंमतीच्या 90 टक्क्यांपर्यंत आर्थिक सहाय्य आणि लवचिक परतफेड योजना देऊन आम्ही ही प्रक्रिया अधिक सहज आणि तणावमुक्त बनवण्याचा प्रयत्न करत आहोत.

ही मोहीम सध्या महाराष्ट्रातील पिंपरी-चिंचवड, पनवेल, पुणे, जळगाव, बदलापूर, नागपूर, नाशिक या टियर-2 शहरांमध्ये राबवली जात आहे. तसेच, गुजरातमधील अहमदाबाद, बडोदा, राजकोट, वापी, गांधीधाम, हिंमतनगर, सुरेंद्रनगर, अंकलेश्वर आणि इतर शहरी भागातही ही मोहीम विस्तारली जाईल.

-----------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande