भारतात २०२६ कावासाकी व्हर्सिस ११०० लॉन्च
मुंबई, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। कावासाकीने आपल्या लोकप्रिय अ‍ॅडव्हेंचर टूरर बाईकची नवीन आवृत्ती २०२६ कावासाकी व्हर्सिस 1100 भारतीय बाजारपेठेत सादर केली असून, या बाईकची किंमत १३.८९ लाख (एक्स-शोरूम) अशी जाहीर करण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये भारतात
2026 Kawasaki Versys 1100


मुंबई, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। कावासाकीने आपल्या लोकप्रिय अ‍ॅडव्हेंचर टूरर बाईकची नवीन आवृत्ती २०२६ कावासाकी व्हर्सिस 1100 भारतीय बाजारपेठेत सादर केली असून, या बाईकची किंमत १३.८९ लाख (एक्स-शोरूम) अशी जाहीर करण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२५ मध्ये भारतात पदार्पण केलेल्या व्हर्सिस मालिकेच्या या नव्या मॉडेलने व्हर्सिस 1000 ला पर्याय म्हणून बाजारात प्रवेश केला आहे. नव्या व्हर्सिस ११००मध्ये बाह्य डिझाइन आणि वैशिष्ट्यांमध्ये फारसा बदल करण्यात आलेला नाही, परंतु तिच्या इंजिन आणि परफॉर्मन्समध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यात आली आहे.

२०२६ कावासाकी व्हर्सिस ११०० मध्ये १,०९९ सीसीचे लिक्विड-कूल्ड, इन-लाइन फोर-सिलिंडर इंजिन देण्यात आले आहे, जे सिक्स-स्पीड गिअरबॉक्स आणि रिटर्न शिफ्ट ट्रान्समिशनसह जोडले गेले आहे. हे नवीन पॉवर युनिट १३३ एचपी कमाल शक्ती आणि ११२ एनएम टॉर्क निर्माण करते, जे मागील व्हर्सिस १०००च्या तुलनेत अधिक दमदार आहे. या वाढीव पॉवरमुळे बाईकच्या क्रूझिंग क्षमतेत लक्षणीय वाढ झाली असून ती अधिक स्मूथ आणि झपाट्याने राईडिंग अनुभव देते.कावासाकीच्या या नव्या बाईकमध्ये गती वाढविताना इंजिनचा प्रतिसाद अतिशय अचूक मिळतो. कमी आरपीएमपासून ते उच्च आरपीएमपर्यंत सतत ताकदीचा पुरवठा मिळतो, ज्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासातही रायडरला थकवा जाणवत नाही. विशेष म्हणजे, या बाईकच्या इंजिनचा घुमणारा थ्रोटल साऊंड राईडिंगचा अनुभव अधिक रोमांचक बनवतो.

इंजिनशक्ती बरोबरच कावासाकीने ईसीयू (इंजिन कंट्रोल युनिट) मध्ये सुधारणा करून इंधन कार्यक्षमता वाढवली आहे. त्यामुळे व्हर्सिस ११०० फक्त वेगासाठीच नव्हे, तर इंधन बचतीसाठीही उपयुक्त ठरते. या बाईकमध्ये २१ लिटर क्षमतेचा मोठा इंधन टँक देण्यात आला आहे, ज्यामुळे दीर्घ अंतराचे टूरिंग दरम्यान वारंवार इंधन भरण्याची गरज भासत नाही.वैशिष्ट्यांच्या बाबतीतही ही बाईक अत्याधुनिक आहे. २०२६ कावासाकी व्हर्सिस ११०० मध्ये कावासाकी ट्रॅक्शन कंट्रोल (केटीआरसी), कावासाकी कॉर्नरिंग मॅनेजमेंट फंक्शन (केसीएमएफ) आणि कावासाकी इंटेलिजेंट अँटी-लॉक ब्रेक सिस्टम (केआयबीएस) यांसारखी प्रगत सुरक्षा आणि नियंत्रण प्रणाली दिल्या आहेत. या फीचर्समुळे वेगवान किंवा वळणदार रस्त्यांवरही बाईकवर नियंत्रण राखणे सोपे होते आणि रायडरला अधिक आत्मविश्वास मिळतो.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande