अहमदपूर : अवैध वाळू वाहतूक करणारा २० लाखांचा टिप्पर जप्त
लातूर, 21 ऑक्टोबर (हिं.स.)।अहमदपूर पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक करणारा सुमारे २० लाख रुपयांचा हायवा टिप्पर जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
अ


लातूर, 21 ऑक्टोबर (हिं.स.)।अहमदपूर पोलिसांनी अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे. या कारवाईत विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक करणारा सुमारे २० लाख रुपयांचा हायवा टिप्पर जप्त करण्यात आला असून, दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​पोलीस स्टेशन अहमदपूर येथे दाखल झालेल्या माहितीनुसार अहमदपूर ते शिरूर ताजबंद रस्त्यावर जवळगा पाटी येथे ही कारवाई करण्यात आली.

​पोलीस कर्मचारी किरणकुमार माधवराव भिसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शारुख मौलाली सयद (वय २८, रा. बामाजीचीवाडी, उदगीर) हा पांढऱ्या-निळ्या रंगाच्या हायवा टिप्पर (क्र. एमएच २४ जे ९९३९) मधून शासनाचा कर बुडवून वाळूची अवैद्य वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले.

​पोलिसांनी या कारवाईत अंदाजे ५ ब्रास किंमतीची (रु. २५,०००/-) अवैध वाळू आणि वाळू वाहतुकीसाठी वापरलेला अंदाजे रु. २०,००,०००/- किंमतीचा हायवा टिप्पर, असा एकूण रु. २० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

​टिप्पर चालक शारुख सयद आणि गाडी मालक संतोष शेळके (रा. कोकणगा) या दोघांविरुद्ध ३०३(२), ३(५)बीएनएस सह कलम १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.,

पुढील तपास पोउपनि आनंद श्रीमंगल यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई सुरू राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande