जळगाव, 21 ऑक्टोबर, (हिं.स.) गेल्या आठवड्यात मोठी भाववाढ झालेल्या चांदीच्या भावात घसरण झाली आहे. एक हजार रुपयांनी भाव कमी होऊन ती १ लाख ७० हजार रुपयांवर आली आहे. तर सोन्याच्या भावात १०० रुपयांची घसरण होऊन ते १ लाख २८ हजार ४०० रुपयांवर आले आहे. गेल्या आठवड्यात चांदीच्या भावात सतत वाढ होत जाऊन ती एक लाख ९५ हजार रुपयांवर पोहोचली होती. त्यानंतर मोठी घसरण होत जाऊन १६ ऑक्टोबर रोजी ती १ लाख ७६ हजार रुपयांवर आली. त्यानंतर दोन हजार रुपयांची वाढ झाली. मात्र, थेट सात हजार रुपयांची घसरण झाली होती. जळगाव सुवर्णपेठेत चांदीच्या दरात एक हजार रुपयांनी भाव कमी होऊन ती १ लाख ७० हजार रुपयांवर आली आहे. तर सोन्याच्या भावात १०० रुपयांची घसरण होऊन ते १ लाख २८ हजार ४०० रुपयांवर आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर