नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर (हिं.स.) : फटाक्यांच्या आतषबाजीमुळे दिल्ली आणि एनसीआरमध्ये प्रदूषणाचे स्तर प्रचंड वाढले आहे. त्यामुळे आज, मंगळवारी सकाळी दिल्लीमध्ये एअर क्वॉलिटी इंडेक्स (एक्यूआय) 400 नोंदवण्यात आला.
दिवाळीच्या उत्सवात सोमवारी रात्री झालेल्या फटाक्यांच्या आतषबाजीनंतर दिल्ली-एनसीआरमधील हवा अत्यंत प्रदूषित व विषारी झाली आहे. परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की लोकांना श्वास घेण्यातही अडचण येत आहे. दिल्लीत आज, मंगळवारी सकाळच्या हवामान आणि वायू प्रदूषणाबाबत बोलायचं झालं, तर दिल्लीसह आजूबाजूच्या भागांमध्ये एक्यूआय 400 च्या वर पोहोचला आहे, जो अतिशय खराब श्रेणीत मोडतो.
वायू गुणवत्ता निर्देशांकाच्या श्रेणीनुसार 0-50 चांगला, 51-100 समाधानकारक, 101-200 मध्यम
201-300: खराब, 301-400: अतिशय खराब आणि 401-500: गंभीर मानला जातो. दिल्लीचा एक्यूआय “अतिशय खराब” किंवा “गंभीर” श्रेणीत गेल्यामुळे दिल्ली-एनसीआरमधील नागरिकांना श्वास घेणेही कठीण झाले आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी