दिसपूर, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन ७ आणि ८ नोव्हेंबर रोजी दोन दिवसांच्या दौऱ्यावर आसाममध्ये येणार आहेत. केंद्रीय वित्त मंत्री ८ नोव्हेंबरला बिश्वनाथ जिल्ह्यातील गहपूर येथील भोलागुडीमध्ये आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील.
केंद्रीय मंत्री सीतारमन पहिल्या आसामी चित्रपट ‘जयमती’च्या निर्मिती स्थळ भोलागुडीमध्ये उभारण्यात येणाऱ्या शहीद कनकलता बरुवा विद्यापीठाची पायाभरणी करणार आहेत. सुमारे ७४० एकर जमिनीवर उभारल्या जाणार्या या राज्यस्तरीय विद्यापीठासाठी आसाम सरकार पहिल्या टप्प्यात ३५० कोटी रुपये खर्च करणार आहे.यासंदर्भात आज आसाम सरकारच्या अर्थमंत्री मंत्री अजंता नेओग आणि राज्याचे मुख्य सचिव भोलागुडीमध्ये जाऊन आवश्यक तयारींचा आढावा घेतला आणि अधिकार्यांना आवश्यक सूचना दिल्या. त्यांनी सांगितले की, भोलागुडीमध्ये उभारल्या जाणाऱ्या या राज्यस्तरीय विद्यापीठामुळे या क्षेत्रातील लोकांसाठी शिक्षणाचे नवी दारे उघडली जातील.
--------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule