चीनचे आमच्यासोबत करार केला नाही तर आम्ही चीनवर १५५ टक्के टॅरिफ लावू - ट्रम्प
वॉशिंग्टन, 21 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिका आणि चीन यांच्यातील टॅरिफसंदर्भातील वाद वाढताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (दि.२०) फेअर ट्रेड डीलबाबत बोलताना चीनला थेट इशारा दिला. त्यांनी सांगितले की, जर चीनचे अध्यक्ष शी जिनप
ट्रम्प


वॉशिंग्टन, 21 ऑक्टोबर (हिं.स.)।अमेरिका आणि चीन यांच्यातील टॅरिफसंदर्भातील वाद वाढताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (दि.२०) फेअर ट्रेड डीलबाबत बोलताना चीनला थेट इशारा दिला. त्यांनी सांगितले की, जर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आमच्यासोबत करार करत नसतील, तर आम्ही चीनवर १५५ टक्के टॅरिफ लावू. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्यासोबत व्हाइट हाऊसमध्ये आवश्यक खनिजांसंदर्भातील करारावर स्वाक्षरी करताना ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलं.

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांसोबतच्या द्विपक्षीय चर्चेपूर्वी ट्रम्प म्हणाले, “माझ्या मते, चीन आमचा खूप सन्मान करतो. ते आम्हाला टॅरिफच्या स्वरूपात पैसे देत आहेत. ते ५५% टॅरिफ भरत आहेत, ही खूप मोठी रक्कम आहे. चीन १ नोव्हेंबरपर्यंत १५५% टॅरिफ भरू शकतो, जोपर्यंत आपण करार करत नाही.”

राष्ट्रपती ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिका अनेक देशांबरोबर व्यापार करार करत आहे. त्यांनी असा दावा केला की, अनेक असे देश आहेत, जे पूर्वी अमेरिकेचा गैरफायदा घेत होते, पण आता त्यांच्याशीही यथोचित करार झाले आहेत. ट्रम्प पुढे म्हणाले, “मला आशा आहे की आपण शी जिनपिंग यांच्याशी एक उत्तम फेअर ट्रेड डील करू. मला वाटतं, तुमच्यापैकी बरेचजण तिथे उपस्थित असतील. हे खूपच रोमांचक असेल.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande