इस्लामाबाद, 21 ऑक्टोबर (हिं.स.)रावळपिंडी कसोटी सामन्यात केशव महाराजने आपल्या फिरकी गोलंदाजीने चमकदार कामगिरी केली. आणि पाकिस्तानी डावात ७ विकेट्स घेण्याची किमया साधली. या सात विकेट्सह केशव महाराजाने पाकिस्तानी भूमीवर यशस्वीरित्या इतिहास रचला आहे. कसोटी सामन्यांमध्ये कोणत्याही दक्षिण आफ्रिकेच्या फिरकी गोलंदाजाने पाकिस्तानविरुद्ध सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरीचा हा विक्रम आहे. त्याने पॉल ऍडम्सला मागे टाकत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. पाकिस्तानविरुद्ध ऍडम्सची सर्वोत्तम कामगिरी १२८ धावांत ७ विकेट्स अशी होती.
दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूंची पाकिस्तानविरुद्ध कसोटी क्रिकेटमधील ५ सर्वोत्तम गोलंदाजांची आकडेवारी
केशव महाराज - ७/१०२
पॉल ऍडम्स - ७/१२८
सेनुरन मुथुस्वामी - ६/११७
इम्रान ताहिर - ५/३२
जॉर्ज लिंडे - ५/६४
पाकिस्तानमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूने सर्वाधिक कसोटी विकेट्स
केशव महाराज - १७ विकेट्स
पॉल अॅडम्स - १२ विकेट्स
पॉल हॅरिस - १२ विकेट्स
सेनुरन मुथुस्वामी - ११ विकेट्स
पॅट सिमकॉक्स - ८ विकेट्स
केशव महाराज हा पराक्रम करणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला आहे.
इतकेच नाही तर केशव महाराज जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात एका डावात ७ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने तीनवेळा अशी कामगिरी करत भारताच्या आर. अश्विनला मागे टाकले आहे. अश्विनने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत दोनदा एका डावात ७ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता.
WTC मध्ये एका डावात सर्वाधिक ७ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेणारे गोलंदाज
३ - केशव महाराज (बांगलादेश विरुद्ध दोनदा, पाकिस्तान विरुद्ध)
२ - आर. अश्विन (दक्षिण आफ्रिका विरुद्ध २०१९, वेस्ट इंडिज विरुद्ध २०२३)
२ - मॅट हेन्री (दक्षिण आफ्रिका विरुद्ध २०२२, ऑस्ट्रेलिया विरुद्ध २०२४)
२ - नोमान अली (श्रीलंका विरुद्ध २०२३, इंग्लंड विरुद्ध २०२४)
२ - साजिद खान (बांगलादेश विरुद्ध २०२१, इंग्लंड विरुद्ध २०२४)
WTC मध्ये सर्वाधिक ५ बळी घेणारे डावखुरा फिरकीपटू
९ - प्रभात जयसूर्या (श्रीलंका)
८ - नोमान अली (पाकिस्तान), तैजुल इस्लाम (बांगलादेश)
७ - केशव महाराज (दक्षिण आफ्रिका)
६ - रवींद्र जडेजा (भारत), अजाज पटेल (न्यूझीलंड)
५ - अक्षर पटेल (भारत)
डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणून कसोटी सामन्यात सर्वाधिक ५ विकेट्स घेणारा केशव हा जगातील १० वा गोलंदाज आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे