नवी मुंबईत बहुमंजिली इमारतीला भीषण आग; ४ जणांचा मृत्यू तर १० जखमी
मुंबई, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। : नवी मुंबईच्या वाशी परिसरातील एका बहुमंजिली इमारतीत सोमवारी रात्री आग लागली. या अपघातात ४ लोक जिवंत जळून मृत्यूमुखी पडले तर १० लोक गंभीरपणे जळाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वेदिका सुंदर बालकृष्णन (वय 6), कमला हिरल
नवी मुंबईत बहुमंजिली इमारतीला भीषण आग


मुंबई, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। : नवी मुंबईच्या वाशी परिसरातील एका बहुमंजिली इमारतीत सोमवारी रात्री आग लागली. या अपघातात ४ लोक जिवंत जळून मृत्यूमुखी पडले तर १० लोक गंभीरपणे जळाले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वेदिका सुंदर बालकृष्णन (वय 6), कमला हिरल जैन (वय 84), सुंदर बालकृष्णन (वय 44), पुजा राजन (वय 39) अशी मृत झालेल्यांची नावे आहेत. ही आग मध्यरात्री सुमारे १२:३० वाजताच्या सुमारास लागली. नवी मुंबईतील सेक्टर १४ मधील एमजीएम कॉम्प्लेक्समधील रहेजा रेजिडेन्सीच्या १०व्या मजल्यावर आग लागली आणि काही वेळात ती ११व्या आणि १२व्या मजल्यापर्यंत पोहोचली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “आग लागल्यामुळे २ महिला, १ पुरुष आणि ६ वर्षांच्या एका मुलीचा मृत्यू झाला. १० जण गंभीर जखमी झाले होते. सर्वांना उपचारासाठी फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यापैकी काहींना डिस्चार्ज देण्यात आले आहे आणि काहींचा उपचार अजूनही सुरू आहे.” आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. आग लागल्याची माहिती मिळताच फायर ब्रिगेडची टीम घटनास्थळी पोहोचली. आग इतकी भीषण होती की अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर सकाळी ४ वाजता आग आटोक्यात आली. पोलिस हा संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. नगरसेवक आणि महापालिका अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात समोर आले आहे की, इमारतीतील विद्युत वायरिंग जुनी होती, त्यामुळे शॉर्टसर्किट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दुर्घटनेमुळे वाशी परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिक आणि रहिवाशांनी शासनाकडे इमारतींच्या सुरक्षा तपासणीसाठी विशेष मोहीम राबवण्याची मागणी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande