राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू केरळ दौऱ्यावर
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर (हिं.स.) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या केरळच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर असतील. त्या 24 ऑक्टोबर पर्यंत केरळच्या दौऱ्यावर राहणार असल्याचे राष्ट्रपती सचिवालयाने सांगितले आहे. राष्ट्रपती सचिवालयानुसार राष्ट्रपती मंळवारी संध्याकाळ
द्रौपदी मुर्मू, राष्ड्रपती


नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर (हिं.स.) : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या केरळच्या 4 दिवसांच्या दौऱ्यावर असतील. त्या 24 ऑक्टोबर पर्यंत केरळच्या दौऱ्यावर राहणार असल्याचे राष्ट्रपती सचिवालयाने सांगितले आहे.

राष्ट्रपती सचिवालयानुसार राष्ट्रपती मंळवारी संध्याकाळी तिरुवनंतपुरम येथे पोहोचतील. तर 22 ऑक्टोबर रोजी त्या सबरीमला मंदिरात दर्शन घेतील व आरतीला उपस्थित राहतील. त्यानंतर 23 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती तिरुवनंतपुरम येथील राजभवनात भारताचे माजी राष्ट्रपती के. आर. नारायणन यांच्या पुतळ्याचे अनावरण करतील. त्यानंतर त्या वर्कला येथील शिवगिरी मठात श्री नारायण गुरू यांच्या महासमाधी शताब्दी वर्षाच्या उद्घाटन समारंभाचा शुभारंभ करतील. त्याच दिवशी त्या पलई येथील सेंट थॉमस कॉलेजच्या प्लॅटिनम जुबिली समारोप सोहळ्यातही सहभागी होतील. तसेच 24 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपती एर्नाकुलम येथील सेंट टेरेसा कॉलेजच्या शताब्दी समारोहात सहभागी होणार आहेत.

दरम्यान, सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली आणि त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती भवनात माझी भेट घेतली आणि दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याची माहिती राष्ट्रपतींनी ट्विटरवर संदेश जारी करत दिली.

---------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande