जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून साने ताकाची यांची नियुक्ती; मोदींनी केले अभिनंदन
नवी दिल्ली , 21 ऑक्टोबर (हिं.स.)।जपानच्या संसदेने मंगळवारी अतिशय रूढीवादी विचारसरणीच्या नेत्या साने ताकाइची यांना देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवडले आहे. 64 वर्षांच्या साने ताकाइची या ‘लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी’ (एलडीपी) च्या प्रमुख आहेत
जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून साने ताकाची यांची नियुक्ती; पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन


नवी दिल्ली , 21 ऑक्टोबर (हिं.स.)।जपानच्या संसदेने मंगळवारी अतिशय रूढीवादी विचारसरणीच्या नेत्या साने ताकाइची यांना देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून निवडले आहे. 64 वर्षांच्या साने ताकाइची या ‘लिबरल डेमोक्रॅटिक पार्टी’ (एलडीपी) च्या प्रमुख आहेत. साने ताकाइची पंतप्रधान झाल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदींनी आपल्या ‘एक्स’ अकाउंटवर लिहिलं, “साने ताकाइची यांना जपानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा. मी भारत-जपान यांच्यातील विशेष रणनीतिक आणि जागतिक भागीदारी अधिक बळकट करण्यासाठी तुमच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहे.आपले दृढ होत चाललेले संबंध हिंद-प्रशांत क्षेत्र आणि त्यापलीकडेही शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत.”

साने ताकाइची पंतप्रधान म्हणून शिगेरू इशिबा यांची जागा घेतील. ही जपानसाठी एक ऐतिहासिक घटना आहे. साने ताकाइची एलडीपीच्या नेत्या होणाऱ्या पहिल्या महिला आहेतच, पण त्याहीपेक्षा विशेष म्हणजे त्या द्वितीय महायुद्धानंतरच्या काळातील अशा काही मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत, ज्यांनी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही उंच स्थान मिळवलं आहे. ताकाइची या माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्या “स्वतंत्र आणि खुले हिंद-प्रशांत” या दृष्टिकोनाला पाठिंबा देतात. त्या अमेरिका आणि ‘क्वाड’सोबत सखोल सहकार्याच्या बाजूने आहेत.क्वाड ही ऑस्ट्रेलिया, भारत, जपान आणि अमेरिका यांच्यातील एक राजनैतिक भागीदारी आहे, जी हिंद-प्रशांत क्षेत्रात स्थैर्य, शांतता, समृद्धी आणि समावेशिता आणण्यासाठी वचनबद्ध आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande