सियोल, 21 ऑक्टोबर (हिं.स.)।दक्षिण कोरियाच्या राजधानी सियोलमधील एका इमारतीला अचानक आग लागली. काही क्षणांतच या आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि 100 हून अधिक लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवित किंवा मालहानी झाल्याची माहिती सध्या तरी समोर आलेली नाही.
ही आग आज, मंगळवारी सकाळी सियोल प्लाझा जवळील सियोल सेंटर बिल्डिंगमध्ये लागली होती. जवळपास 110 लोकांना इमारतीबाहेर सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. आगीत भाजल्यामुळे 3 लोक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
स्थानिक मीडियानुसार, आग लागल्याच्या वेळी इमारतीत 10 बांधकाम कामगार उपस्थित होते, जे तात्काळ गच्चीवर पळाले आणि मदतीची वाट पाहत होते. आग ही इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर लागली होती, जिथे काही बांधकामाचे काम सुरू होते. मात्र, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
ही पहिली वेळ नाही आहे की सियोलमध्ये आग लागल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. याआधी सप्टेंबर महिन्यात नॅशनल डेटा इन्फ्रास्ट्रक्चर सेंटरला आग लागली होती, ज्यामुळे अनेक सरकारी सेवा ठप्प झाल्या होत्या. त्या वेळी देखील सर्व नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले होते, मात्र आगीमुळे सरकारचे मोठे नुकसान झाले होते.या घटनेला अजून महिनाही झाला नसताना सियोलमध्ये पुन्हा एकदा आगीने खळबळ उडवली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode