स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष मोहीम 5.0 सुरू
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। पर्यटन मंत्रालय, त्यांची भारतीय पर्यटन कार्यालये, हॉटेल व्यवस्थापन संस्था (आईएचएम), भारतीय पर्यटन आणि प्रवास व्यवस्थापन संस्था (आईआईटीटीएम), भारत पर्यटन विकास महामंडळ (आईटीडीसी) आणि कार्यक्रम विभागांसह, प्रलंबित बाब
Special Campaign 5.0 launched promote cleanliness


नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। पर्यटन मंत्रालय, त्यांची भारतीय पर्यटन कार्यालये, हॉटेल व्यवस्थापन संस्था (आईएचएम), भारतीय पर्यटन आणि प्रवास व्यवस्थापन संस्था (आईआईटीटीएम), भारत पर्यटन विकास महामंडळ (आईटीडीसी) आणि कार्यक्रम विभागांसह, प्रलंबित बाबींचा निपटारा करण्याकरिता विशेष मोहिमेत (एससीडीपीएम) 5.0 मध्ये सक्रियपणे सहभागी होत आहे.

पर्यटन मंत्रालयाने विशेष मोहीम 5.0 साठी एकूण 6429 उदिष्ट्ये निर्धारित केली आहेत आणि ती सर्व एससीडीपीएम पोर्टलवर अपलोड केली आहेत. विशेष मोहीम 5.0 चा भाग म्हणून एकूण 413 ठिकाणे स्वच्छतेसाठी निश्चित करण्यात आली आहेत. पुनरावलोकनासाठी 4700 पेक्षा जास्त प्रत्यक्ष फाइल्स आणि 1,100 ई-ऑफिस फाइल्स निश्चित केल्या आहेत.

आतापर्यंत, 1553 उपक्रम राबविण्यात आले आहेत, जे एकूण उद्दिष्टांच्या 24.15% आहेत. या उपक्रमांतर्गत 14,095 चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली आहे आणि भंगार विल्हेवाटीतून 172991 /- रुपये महसूल मिळाला आहे. या कामाच्या प्रगतीचे निरीक्षण केले जात असून त्याचा आलेख प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार निवारण विभागाच्या (डीएआरपीजी) एससीडीपीएम पोर्टलवर अपलोड केला जात आहे. पर्यटन मंत्रालय आणि त्यांची क्षेत्रीय कार्यालये/संस्था सोशल मीडिया पोस्टद्वारे विशेष मोहीम 5.0 चा भाग म्हणून नियमितपणे राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांवर प्रकाश टाकत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande