बार्शीत लोखंडी रॉडने दोघांना गंभीर मारहाण
सोलापूर, 21 ऑक्टोबर, (हिं.स.)। आरडाओरडा करू नका, असे म्हटल्याचा राग मनात धरून चौघांनी मिळून दोघांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी करत ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार बार्शीत घडला. शिवम माने, सार्थक रवींद्र देवकते व त्यांचे दोन मित्र अ
बार्शीत लोखंडी रॉडने दोघांना गंभीर मारहाण


सोलापूर, 21 ऑक्टोबर, (हिं.स.)। आरडाओरडा करू नका, असे म्हटल्याचा राग मनात धरून चौघांनी मिळून दोघांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी करत ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार बार्शीत घडला. शिवम माने, सार्थक रवींद्र देवकते व त्यांचे दोन मित्र अशी या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे आहेत.

संतोष भारत देवकर (वय 35, रा. भराडीया प्लॉट, अलिपूर रोड) यांनी याबाबत शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पहाटे साडेपाचच्या सुमारास ते व त्यांचा भाऊ सूरज कारमधील किराणा माल खाली उतरवीत होते. त्यावेळी शिवम माने मोठ्याने हार्न वाजवीत त्याठिकाणी आला. त्यावेळी देवकर बंधू त्यास पाच मिनिटे थांब असे म्हणताच शिवमने शिवीगाळ करून तुझ्या बापाचा रस्ता आहे काय असे म्हणून जोरात बोलून दमदाटी सुरू केली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande