पुणे, 21 ऑक्टोबर (हिं.स.)। सायबर चोरट्यांनी डेक्कन आणि कोथरूड परिसरातील दोन महिलांना शेअर बाजारात मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत १५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी डेक्कन आणि कोथरूड पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, एरंडवणे गावठाणातील अमेन सोसायटीमध्ये राहणाऱ्या २८ वर्षीय महिलेच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तींनी संपर्क साधला. त्यांनी शेअर बाजारात गुंतवणुकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्यावर विश्वास ठेवून संबंधित महिलेने सहा लाख रुपये त्या व्यक्तीच्या बॅंक खात्यात जमा केले. मात्र, कोणताही परतावा मिळाला नाही. ही बाब लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत धाव घेतली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु