सॅमसंगने लाँच केला गॅलेक्सी एक्सआर हेडसेट
मुंबई, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। सॅमसंगने ऑक्टोबर 2025 मध्ये आयोजित आपल्या गॅलेक्सी अनपॅक इव्हेंटमध्ये गॅलेक्सी एक्सआर हेडसेट सादर केले आहे. ही कंपनीची पहिली एक्स्टेंडेड रिऍलिटी (एक्सआर) हेडसेट असून, यामध्ये रिअल-वर्ल्ड वातावरणात ऑगमेंटेड रिऍलिटी (एआर)
Samsung Galaxy XR Headset


मुंबई, 22 ऑक्टोबर (हिं.स.)। सॅमसंगने ऑक्टोबर 2025 मध्ये आयोजित आपल्या गॅलेक्सी अनपॅक इव्हेंटमध्ये गॅलेक्सी एक्सआर हेडसेट सादर केले आहे. ही कंपनीची पहिली एक्स्टेंडेड रिऍलिटी (एक्सआर) हेडसेट असून, यामध्ये रिअल-वर्ल्ड वातावरणात ऑगमेंटेड रिऍलिटी (एआर) अनुभव देण्यासाठी दोन लेन्सेस समाविष्ट आहेत. हेडसेटमध्ये 90Hz मायक्रो-ओएलईडी डिस्प्ले, स्नॅपड्रॅगन XR2+ Gen 2 प्रोसेसर, 16GB RAM, 256GB स्टोरेज, 3D फोटो आणि व्हिडिओ कॅप्चरिंग क्षमता, बहु-कॅमेरा सेटअप, आय ट्रॅकिंग आणि सरासरी वापरासाठी 2 तासांपर्यंत बॅटरी क्षमता आहे. हे गुगलच्या नवीन अँड्रॉइड XR प्लॅटफॉर्मवर चालते, जे सॅमसंग, गुगल आणि क्वालकॉम यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आले आहे.

गॅलेक्सी एक्सआर हेडसेटची किंमत अमेरिकेत $1,799 (सुमारे 1.5 लाख रुपये) आहे. दक्षिण कोरिया मध्ये याची किंमत KRW 2,690,000 (सुमारे 1.65 लाख रुपये) आहे. जे लोक पूर्ण रक्कम एकावेळी द्यायला इच्छुक नाहीत, त्यांच्यासाठी सॅमसंग $149 (सुमारे 13,000 रुपये) प्रति महिना 12 महिन्यांसाठी देण्याची सोय केली आहे. सध्या हे हेडसेट फक्त अमेरिकेत आणि दक्षिण कोरियामध्ये उपलब्ध आहे आणि कंपनीच्या ऑनलाइन स्टोअरमार्फत खरेदी करता येते. भारतात लाँचबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. हा डिव्हाइस सिंगल सिल्वर शॅडमध्ये उपलब्ध आहे.

गॅलेक्सी एक्सआर हेडसेटमध्ये 3,552 x 3,840 पिक्सेल रिझोल्यूशनसह मायक्रो-ओएलईडी डिस्प्ले आहेत, ज्यामध्ये एकूण 27 दशलक्ष पिक्सेल्स, 6.3 मायक्रॉन पिक्सेल पिच, 90Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 100 डिग्री व्हर्टिकल आणि 109 डिग्री हॉरिझंटल फील्ड ऑफ व्ह्यू आहे. हेडसेटमध्ये स्नॅपड्रॅगन XR2+ Gen 2 चिपसेट आहे, जे 16GB RAM आणि 256GB स्टोरेजसह जोडलेले आहे. प्रगत AI प्रोसेसिंगसाठी क्वालकॉम हेक्सागॉन एनपीयू सुद्धा यामध्ये आहे.

हे हेडसेट एर्गोनॉमिक डिझाइनसह तयार केलेले असून, कपाळ आणि डोक्याच्या मागच्या भागावर ताण समप्रमाणात वितरित होते. याचे वजन 545 ग्रॅम असून, बॅटरी पॅक स्वतंत्र असल्यामुळे हेडसेटचे वजन फक्त 302 ग्रॅम आहे. सामान्य वापरात बॅटरी 2 तास टिकते, तर व्हिडिओ पाहताना 2.5 तासांची क्षमता आहे. तसेच, हेडसेटमध्ये वेगळे करता येणारे लाइट शील्ड आहे, जी काढल्यास वापरकर्ता अधिक आरामदायी अनुभव मिळतो आणि लाइट शील्ड लावल्यास दृश्यांचा अधिक खोल अनुभव मिळतो.

हे हेडसेट अनेक कॅमेरे, आय ट्रॅकर्स आणि सेन्सर्ससह येते आणि 6.5MP कॅमेऱ्याद्वारे 3D फोटो व व्हिडिओ कॅप्चर करण्याची क्षमता देते. तसेच, दोन 2-वे स्पीकर्स (वुफर व ट्वीटर), सहा मायक्रोफोन अ‍ॅरे, वाय-फाय 7 आणि ब्लूटूथ 5.4 कनेक्टिव्हिटी यासह येते.

गॅलेक्सी एक्सआर हेडसेट गुगलच्या अँड्रॉइड एक्सआर प्लॅटफॉर्मवर चालते आणि सिस्टम लेवलवर जेमिनी एआय सह सखोल समाकलित आहे, ज्याद्वारे वापरकर्ते व्हॉईस, जेस्चर आणि व्हिजन वापरून कार्ये पार पाडू शकतात. यामध्ये गुगल मॅप्स, युट्यूब, सर्कल टू सर्च, गुगल फोटोज यासारख्या गुगल अ‍ॅप्सचा समावेशही आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एक्सआर हेडसेटच्या माध्यमातून एक्सआर तंत्रज्ञानातील नवीनतम अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहे आणि यामुळे वापरकर्त्यांना आभासी आणि वास्तविक जगातील अनुभव एकत्रितपणे मिळेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande