ब्रिटनमध्ये ज्यू धर्मस्थळावर दहशतवादी हल्ला २ ठार ३ जखमी ; भारताने व्यक्त केले दुःख
लंडन, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।ब्रिटनमधील मँचेस्टर शहरातील एका यहूदी प्रार्थना स्थळाबाहेर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. तपासानंतर ब्रिटन पोलिसांनी या घटनेला “दहशतवादी हल्ला” घोषित केले आहे. माहितीनुसार, ब्
ब्रिटनमध्ये ज्यू मंदिरावरील दहशतवादी हल्ल


लंडन, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।ब्रिटनमधील मँचेस्टर शहरातील एका यहूदी प्रार्थना स्थळाबाहेर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला असून 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. तपासानंतर ब्रिटन पोलिसांनी या घटनेला “दहशतवादी हल्ला” घोषित केले आहे.

माहितीनुसार, ब्रिटनमधील मँचेस्टर शहरात एका यहूदी धर्मस्थळाजवळ योम किप्पूर सण साजरा केला जात असताना एका कारने लोकांना चिरडले आणि त्यानंतर चाकूने हल्ला केला. ज्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत.यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.ग्रेटर मँचेस्टर पोलिसांनी सांगितले की, हल्लेखोराने जाणूनबुजून यहूदी धर्मस्थळाबाहेर ही घटना घडवून आणली. संशयित हल्लेखोराला गोळी मारण्यात आली असून त्याचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळी बॉम्ब निकामी करणारी विशेष टीम उपस्थित असून हल्लेखोराकडे कुठलाही बॉम्ब किंवा स्फोटक होते का हे तपासले जात आहे. पोलिसांनी ‘प्लॅटो ’ अलर्ट जाहीर केला आणि घटनेला “प्रमुख घटना” म्हणून वर्गीकृत केले.

या हल्ल्याबाबत ब्रिटनचे राजा चार्ल्स तृतीय यांनी म्हटले की, ही घटना अत्यंत धक्कादायक असून ते खूप दुःखी आहेत. पंतप्रधान कीअर स्टारमर यांनी सांगितले की, योम किप्पूर या यहूदी सणाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनमधील सर्व धर्मस्थळांभोवती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येईल.

पंतप्रधान स्टारमर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत लिहिले, “मी क्रम्पसॉल येथील एका सिनगॉगवर (यहूदी प्रार्थनास्थळ) झालेल्या हल्ल्यामुळे हादरून गेलो आहे. हा हल्ला यहूदी दिनदर्शिकेतील सर्वात पवित्र दिवस योम किप्पूर च्या दिवशी झाला, जे या घटनेला आणखी भीषण बनवते. माझ्या संवेदना सर्व पीडित आणि त्यांच्या प्रियजनांसोबत आहेत. तसेच, आपत्कालीन सेवांना आणि त्वरित कारवाई करणाऱ्या सर्व लोकांना त्यांच्या धैर्याबद्दल धन्यवाद देतो.”

एका दुसऱ्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, “आज सकाळचा हल्ला अतिशय धक्कादायक आहे. मी यासंदर्भात आपत्कालीन बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवण्यासाठी लंडनला परत जात आहे. देशभरातील सर्व सिनगॉग्समध्ये अतिरिक्त पोलीस फोर्स तैनात केला जात आहे. आपला यहूदी समुदाय सुरक्षित राहावा यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू.”दरम्यान भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जायसवाल यांनी या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटले, “गुरुवारी योम किप्पूर प्रार्थना सभेदरम्यान मँचेस्टरमधील हीटन पार्क सिनगॉगवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याची आम्ही तीव्र निंदा करतो. विशेषतः हे दु:खदायक आहे की हा अमानवी कृत्य आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनाच्या दिवशी करण्यात आला.”

मंत्रालयाने पुढे म्हटले, “हा हल्ला अतिरेकी प्रवृत्तींमुळे निर्माण झालेल्या धोक्याची एक भीषण आठवण आहे, ज्याचा सामना संपूर्ण जागतिक समुदायाने एकत्र येऊन आणि समन्वयानेच करणे आवश्यक आहे. आमच्या संवेदना आणि प्रार्थना पीडित, त्यांच्या कुटुंबीयांसोबत आणि मँचेस्टर शहरासोबत आहेत. या दुःखद प्रसंगी आम्ही युनायटेड किंगडमच्या जनतेसोबत एकजूट दाखवत उभे आहोत.”

--------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande