छत्रपती संभाजीनगर शहरात ड्रोन उड्डाणास प्रतिबंध
छत्रपती संभाजीनगर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर शहरात येत्या दोन ऑक्टोबर पर्यंत ड्रोन उड्डाणास प्रतिबंध करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात याची अंमलबजावणी तातडीने करण्यात येणार आहे विशेष म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था
छत्रपती संभाजीनगर शहरात ड्रोन उड्डाणास प्रतिबंध


छत्रपती संभाजीनगर, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर शहरात येत्या दोन ऑक्टोबर पर्यंत ड्रोन उड्डाणास प्रतिबंध करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात याची अंमलबजावणी तातडीने करण्यात येणार आहे विशेष म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेता हे आदेश देण्यात येत आहेत. छत्रपती संभाजी नगर शहराच्या पोलिस आयुक्तांनी या संदर्भात आदेश निर्गमित केले आहेत.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ प्रमाणे ड्रोन, रिमोट कंट्रोल्ड मायक्रो-लाइट एअरक्राफ्ट, पॅराग्लायडर, पॅरा मोटर्स, हॅण्ड लायडर्स हॉट एअर बलून इ. उड्डाण क्रियांना पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात दि.२ ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंध करण्यात येत आहे,असे पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी आदेश निर्गमित केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande