2029 पर्यंत संरक्षण क्षेत्रातील निर्यात 50,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल - राजनाथ सिंह
हैदराबाद, 3 ऑक्टोबर (हिं.स.) - 2014 मध्ये भारताची संरक्षण निर्यात सुमारे 600 कोटी रुपये इतकी होती, ती आज 24,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. 2029 पर्यंत संरक्षण क्षेत्रातील निर्यात 50,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास संरक्षण मंत्री राज
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह


हैदराबाद, 3 ऑक्टोबर (हिं.स.) - 2014 मध्ये भारताची संरक्षण निर्यात सुमारे 600 कोटी रुपये इतकी होती, ती आज 24,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. 2029 पर्यंत संरक्षण क्षेत्रातील निर्यात 50,000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल, असा विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. तसेच तेजस लढाऊ विमानांपासून ते आकाश क्षेपणास्त्रे आणि अर्जुन टँकपर्यंत, आपल्या सशस्त्र दलांना मेड-इन-इंडिया उत्पादनांनी सुसज्ज केले जात असल्याचे ते म्हणाले.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज, 3 ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथे जैन आंतरराष्ट्रीय व्यापार समुदायाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला उपस्थित होते. भारताने 2016 मध्ये केलेले सर्जिकल स्ट्राईक, 2019 चे बालाकोट एअर स्ट्राईक आणि 2025 मधील ऑपरेशन सिंदूर या मोहिमा म्हणजे आपल्या नागरिकांचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्याच्या भारताच्या अढळ संकल्पाचे एक सामर्थ्यशाली उदाहरण आहे, असे ते यावेळी म्हणाले. जेव्हा जेव्हा भारताचा अभिमान आणि प्रतिष्ठेला आव्हान दिले गेले, तेव्हा भारताने कधीही तडजोड केलेली नाही. जेव्हा आम्ही पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले तेव्हा आम्ही दहशतवाद्यांचा धर्म विचारला नाही, आम्ही दहशतवादाला लक्ष्य केले नागरिकांना ही नाही आणि लष्करी तळांना ही नाही, असे त्यांनी सांगितले.

भारताचे वाढते लष्करी आणि आर्थिक सामर्थ्य हे इतरांवर सत्ता गाजवण्यासाठी नसून स्वतःच्या सांस्कृतिक मूल्यांचे, आध्यात्मिक परंपरांचे आणि भगवान शंकरांनी शिकवलेल्या मानवतावादी आदर्शांचे रक्षण करण्यासाठी आहे, यावर त्यांनी भर दिला.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून 64% पेक्षा जास्त स्वदेशी सामग्रीसह 97 हलकी लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या अलिकडच्या कराराबद्दल सांगून राजनाथ सिंग म्हणाले की हे भारताच्या आत्मनिर्भरतेच्या प्रवासाचे द्योतक आहे. भारत आज खेळण्यांपासून टँक्स पर्यंत सर्व वस्तूंची निर्मिती करत आहे. भारत जलदगतीने जगाचे उत्पादन केंद्र म्हणून उदयाला येत आहे. आणि लवकरच भारत जगाची फॅक्टरी अर्थात उत्पादन केंद्र बनेल तो दिवस फार दूर नाही. केंद्र सरकारचे हेतू स्पष्ट असून सर्व योजना आणि धोरणे राष्ट्र हिताच्या दृष्टीने आखली असल्यानेच हे शक्य होईल, असे संरक्षणमंत्री म्हणाले.

भारत हा देश सध्या जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे असे सांगून संरक्षण मंत्र्यांनी भारताच्या आर्थिक विकासाचा पैलू विशद केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande