गोदरेज प्रॉपर्टीजला ईएसजी पद्धतींसाठी जीआरईएसबी द्वारे जागतिक पहिला क्रमांक
मुंबईतील या रिअल इस्टेट डेव्हलपरला या वर्षीचे सर्वोच्च 100 पॉईंट्स मिळाले मुंबई, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। 2025च्या ग्लोबल रिअल इस्टेट सस्टेनेबिलिटी बेंचमार्क (जीआरईएसबी) मध्ये 100 गुणांची सर्वोच्च संख्या गाठल्याची घोषणा भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डे
Godrej survey  home lockers


मुंबईतील या रिअल इस्टेट डेव्हलपरला या वर्षीचे सर्वोच्च 100 पॉईंट्स मिळाले

मुंबई, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। 2025च्या ग्लोबल रिअल इस्टेट सस्टेनेबिलिटी बेंचमार्क (जीआरईएसबी) मध्ये 100 गुणांची सर्वोच्च संख्या गाठल्याची घोषणा भारतातील आघाडीच्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने (जीपीएल) (बीएसई स्क्रिप आयडी: गोदरेज पीआरपी)ने केली. यामुळे जागतिक विकासकांमध्ये गोदरेज प्रॉपर्टीजला प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळाला आहे. हा या उद्योगासाठी एक महत्त्वाचा टप्पा आणि ओळख आहे. 2013 पासून कंपनी बेंचमार्क मूल्यांकनात सहभागी झाली आहे. कंपनीची ईएसजी प्रक्रिया ही ग्लोबल रिपोर्टिंग इनिशिएटिव्हच्या (जीआरआई) निकषांनुसार तयार केली जाते. महत्त्वाचे म्हणजे पारदर्शकता आणि सचोटीच्या सर्वोच्च मानकांची पूर्तता होण्याची खात्री दिली जाते.

जीआरईएसबीही एक अशी संस्था आहे जी जगभरातील रिअल इस्टेट संस्थांसाठी पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय (ईएसजी) बेंचमार्क घालून देते. दरवर्षी, जीआरईएसबीहे निकष पूर्ण करणाऱ्या जगभरातील सहभागींचा सन्मान करते. तसेच या संस्था संपूर्ण उद्योगात ईएसजी सुधारणांना चालना देण्यास मदत करतील, एवढी त्यांची माफक अपेक्षा असते.

गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडचे कार्यकारी अध्यक्ष पिरोजशा गोदरेज म्हणाले, गोदरेज प्रॉपर्टीजच्या पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासकीय तत्त्वांना मिळालेल्या जागतिक मान्यतेसाठी आम्ही मनापासून कृतज्ञ आहोत. शाश्वत पद्धती स्वीकारणे ही केवळ आमची जबाबदारी नाही तर एक चांगले भविष्य घडविण्यासाठी ते आवश्यक आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे. ईएसजी मानके सतत वाढवण्यासाठी तसेच समाज आणि पर्यायाने आपल्या पृथ्वीच्या दीर्घकालीन भविष्यासाठी सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande