भारत अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार नाही - पुतीन
मॉस्को, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी (२ ऑक्टोबर) तेल खरेदीवरील अमेरिकेच्या दबावावर टीका केली आणि भारत अमेरिकेच्या दबावापुढे कधीही झुकणार नाही असे सांगितले. त्यांनी यावर भर दिला की भारत आणि चीन हे आत्म-सन्मानाने भर
- पुतीन


मॉस्को, 3 ऑक्टोबर (हिं.स.)।रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी गुरुवारी (२ ऑक्टोबर) तेल खरेदीवरील अमेरिकेच्या दबावावर टीका केली आणि भारत अमेरिकेच्या दबावापुढे कधीही झुकणार नाही असे सांगितले. त्यांनी यावर भर दिला की भारत आणि चीन हे आत्म-सन्मानाने भरलेले राष्ट्र आहेत. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी कधीही भारताच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणारा कोणताही निर्णय घेणार नाहीत.” अमेरिकेवर टीका करताना पुतीन म्हणाले अमेरिका भारत आणि चीनवर दबाव टाकून रशियासोबतचे ऊर्जा संबंध तोडू इच्छितो, मात्र अशा प्रकारच्या कृतींमुळे जागतिक अर्थव्यवस्थेला गंभीर नुकसान होऊ शकते. पुतिन म्हणाले कि, जर अमेरिका रशियाचे व्यापार भागीदार असलेल्या देशांवर अतिरिक्त शुल्क लावेल, तर जागतिक अर्थव्यवस्थेला गंभीर नुकसान होऊ शकते आणि त्यामुळे अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हला व्याजदर कायम उच्च ठेवावे लागतील, ज्याचा थेट परिणाम अमेरिकेच्या आर्थिक वाढीवर होईल. रशियन राष्ट्राध्यक्षांनी सांगितले,“भारतावर लादलेले अमेरिकन शुल्क निष्फळ ठरतील. भारत आणि चीन हे असे देश आहेत, जे आत्म-सन्मान जपतात.”त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर भारत रशियाकडून ऊर्जा खरेदी करणे बंद करतो, तर त्याचे नुकसान भारतालाच होईल. पण भारताची जनता आणि नेतृत्व असा कोणताही निर्णय घेणार नाहीत. पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दर्शवताना सांगितले की, मोदी भारताच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करणारा कोणताही निर्णय घेणार नाहीत. पुढे आपल्या भाषणात पुतिन यांनी अमेरिकेच्या दुहेरी भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी सांगितले की, अमेरिका स्वतः रशियाकडून समृद्ध युरेनियम खरेदी करतो, पण इतर देशांना रशियन ऊर्जा टाळण्यास सांगतो.हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा अमेरिका सातत्याने भारतावर टीका करत आहे की तो रशियाकडून तेल खरेदी करत आहे. ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही अनेक वेळा भारतावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वीही पुतिन यांनी अमेरिकेला इशारा दिला होता की, भारत आणि चीनसारख्या देशांशी वसाहतवाद काळासारख्या भाषेत बोलू नये. त्यांनी म्हटले, “आता वसाहतवादाचा काळ संपला आहे. भारत आणि चीनसारख्या प्राचीन संस्कृती कोणत्याही धमक्यांसमोर झुकणाऱ्या नाहीत.” रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनीही म्हटले की, भारत आणि चीनसारखे देश अमेरिकेच्या दबावाला कधीच झुकणार नाहीत. पुतिन यांनी मोदींना मित्र म्हणून संबोधले आणि ते त्यांच्याशी आत्मविश्वासाने संवाद साधू शकतात असे सांगितले. डिसेंबरच्या सुरुवातीला होणाऱ्या त्यांच्या भारत भेटीबद्दल रशियन राष्ट्राध्यक्षांनी उत्साह व्यक्त केला. भारताच्या मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाच्या खरेदीमुळे निर्माण झालेल्या व्यापार असमतोलाला तोंड देण्यासाठी त्यांनी त्यांच्या सरकारला ठोस पावले उचलण्याचे निर्देशही दिले. त्यांनी यावर भर दिला की, रशिया पश्चिमी निर्बंधांच्या पार्श्वभूमीवरही आपला सकारात्मक आर्थिक विकास टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande