जळगाव - तरुणाला सव्वा लाखांचा गंडा
जळगाव, 3 ऑक्टोबर, (हिं.स.) ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून शहरातील एका नोकरदार तरुणाला तब्बल १ लाख ३२ हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात फिर्यादीने कोणतीही गोपनीय माहिती न दिल्यानेही संशयितांनी फसवणूक केली आहे. या प
जळगाव - तरुणाला सव्वा लाखांचा गंडा


जळगाव, 3 ऑक्टोबर, (हिं.स.) ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून शहरातील एका नोकरदार तरुणाला तब्बल १ लाख ३२ हजारांचा गंडा घालण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात फिर्यादीने कोणतीही गोपनीय माहिती न दिल्यानेही संशयितांनी फसवणूक केली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निमखेडी रोड, शिवधाम मंदिराजवळ राहणारे प्रणेश प्रकाश ठाकूर (वय ३४) यांना एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला. कॉल करणाऱ्याने स्वतःला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या क्रेडिट कार्ड विभागातील अधिकारी म्हणून सांगितले. त्याने क्रेडिट कार्ड संदर्भात माहिती विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रणेश ठाकूर यांनी कोणतीही माहिती दिली नाही. तरीदेखील काही वेळातच त्यांच्या क्रेडिट कार्डमधून १,३२,हजारची रक्कम काढण्यात आली आणि त्यांची आर्थिक फसवणूक झाली. हा प्रकार लक्षात येताच प्रणेश ठाकूर यांनी तातडीने तालुका पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास सुरू आहे.या प्रकारामुळे शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, फसवे कॉल येताच कोणत्याही परिस्थितीत वैयक्तिक व आर्थिक माहिती उघड करू नये, असा सल्ला पोलिसांनी दिला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande