महिंद्रा थार फेसलिफ्ट भारतात लाँच; सुरुवातीची किंमत 9.99 लाख
मुंबई, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। महिंद्रा अँड महिंद्राने त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही थारची फेसलिफ्ट आवृत्ती भारतीय बाजारात लाँच केली आहे. नवीन थारमध्ये डिझाइनमध्ये मोठे बदल नसले तरी केबिनमध्ये अनेक महत्त्वाचे अपडेट्स करण्यात आले आहेत. यामध्ये नवीन टचस्क्री
Mahindra Thar facelift launched


Mahindra Thar facelift launched


मुंबई, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। महिंद्रा अँड महिंद्राने त्यांच्या लोकप्रिय एसयूव्ही थारची फेसलिफ्ट आवृत्ती भारतीय बाजारात लाँच केली आहे. नवीन थारमध्ये डिझाइनमध्ये मोठे बदल नसले तरी केबिनमध्ये अनेक महत्त्वाचे अपडेट्स करण्यात आले आहेत. यामध्ये नवीन टचस्क्रीन डिस्प्ले, अपडेटेड स्टीअरिंग व्हील आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टमसारखी सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

याशिवाय सॉफ्ट-टॉप हटवण्यात आला असून आतील डिझाइन अधिक आकर्षक बनवण्यात आले आहे. इंजिन पर्यायांमध्ये पूर्वीसारखेच टर्बो पेट्रोल आणि डिझेलसोबत मागील चाक तसेच ऑल-व्हील ड्राइव्हचे पर्याय दिले आहेत. व्हेरिएंट लाइनअपमध्येही बदल करून AX ऑप्शनल आणि LX ऐवजी AXT आणि LXT ही नावे देण्यात आली आहेत.

नवीन थारची किंमत बेस मॉडेलसाठी रु 9.99 लाखांपासून सुरू होते, तर टॉप व्हेरिएंटची किंमत रु 16.99 लाखांपर्यंत जाते. यामध्ये बेस मॉडेल जुन्या किंमतीपेक्षा रु 32,000 स्वस्त झाला आहे, तर टॉप मॉडेल रु 38,000 महाग झाला आहे. या एसयूव्हीची बुकिंग ऑनलाइन आणि डीलरशिपवर सुरू झाली असून लवकरच डिलिव्हरीला सुरुवात होणार आहे. महिंद्रा थारची थेट स्पर्धा फोर्स गुरखा आणि मारुती जिमनीशी होत असून ह्युंदाई क्रेटा, टोयोटा हायराइडर, मारुती व्हिक्टोरिस/ग्रँड विटारा, फोक्सवॅगन तैगुन आणि स्कोडा कुशाक यांसारख्या कॉम्पॅक्ट एसयूव्हींपेक्षा ती एक दमदार ऑफ-रोड पर्याय ठरते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande