सरकारी निधी थांबल्यामुळे नासातही शटडाऊन
वॉशिंग्टन, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर उच्च टॅरिफ लावले असताना, त्यांच्या स्वतःच्या देशातच सध्या तीव्र आर्थिक संकट निर्माण झाले आहे. आर्थिकदृष्ट्या गरिबीमुळे अमेरिकेची प्रमुख अंतराळ संस्था नासाने आपले अ
नासा


वॉशिंग्टन, 3 ऑक्टोबर (हिं.स.)। अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर उच्च टॅरिफ लावले असताना, त्यांच्या स्वतःच्या देशातच सध्या तीव्र आर्थिक संकट निर्माण झाले आहे. आर्थिकदृष्ट्या गरिबीमुळे अमेरिकेची प्रमुख अंतराळ संस्था नासाने आपले अनेक दैनंदिन अपडेट्स आणि महत्वाचे ऑपरेशन्स तात्पुरते बंद केले आहेत. नासाच्या अधिकृत वेबसाइटवर याची माहिती देण्यात आली असून असे सांगितले गेले आहे की, सरकारी निधी थांबल्यामुळे नासा “पुढील आदेश येईपर्यंत बंद” राहील.

ही घटना 1 ऑक्टोबर 2025 रोजी अमेरिकेत सरकार शटडाउन झाल्यानंतर समोर आली आहे. काँग्रेस सरकारचा अर्थसंकल्प किंवा तात्पुरती फंडिंग योजना मंजूर करण्यात अपयशी ठरली, त्यामुळे जवळपास सहा वर्षांत प्रथमच सरकार शटडाउन झाली आणि त्याचा परिणाम नासा आणि इतर सरकारी संस्थांवर झाला आहे. या शटडाउनमुळे हजारो कर्मचाऱ्यांना पगाराशिवाय सुटीवर पाठवण्यात आले आहे.

नासाच्या अधिकृत मार्गदर्शक तत्वांनुसार, केवळ जीवन आणि मालमत्तेच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक कामेच सुरू ठेवण्यात येत आहेत. याचा अर्थ असा की नासाचे बरेच प्रकल्प, जसे की अंतराळ विज्ञान संशोधन, जनतेशी संवाद, शिक्षण अभियान हे सर्व सध्या थांबलेले आहेत. निधी थांबल्यामुळे नासाचे दैनंदिन कम्युनिकेशन बंद झाले आहे, सोशल मीडियावर कोणतेही अपडेट्स नाहीत आणि विविध मिशन अपडेट्समध्येही उशीर होत आहे.

तरीही काही महत्वाचे ऑपरेशन्स सुरू ठेवण्यात येत आहेत. यामध्ये आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातील अंतराळवीरांवर लक्ष ठेवणे. सौरमंडळातील कार्यरत अंतराळ यानांची निगराणी. ग्रह सुरक्षा संबंधित उपक्रम, जसे की उल्कापिंड ट्रॅकिंग. हे सगळे ऑपरेशन्स सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक मानले जातात आणि ते मर्यादित कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरू आहेत.

या शटडाउनचा नासाच्या भविष्यातील महत्वाकांक्षी योजनांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. माणसाला पुन्हा चंद्रावर पाठवण्याचा प्रयत्न असलेला ‘आर्टेमिस प्रोग्राम’ यामुळे पुढे ढकलला जाऊ शकतो. नासाच्या निधीवर चालणाऱ्या संशोधन प्रकल्पांनाही फटका बसला असून, त्यामुळे शास्त्रीय अभ्यास, विद्यापीठांमधील सहकार्य, प्रयोगशाळा संशोधन ठप्प झाले आहे. नासासोबत काम करणाऱ्या खासगी कंत्राटदारांनाही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

ही पहिली वेळ नाही की नासाला शटडाउनचा सामना करावा लागतोय. 2018-2019 दरम्यानही मोठा शटडाउन झाला होता, ज्याने अनेक प्रकल्प थांबवले आणि वैज्ञानिक व अभियंत्यांमध्ये अनिश्चितता निर्माण केली होती.

वॉशिंग्टनमधील हा राजकीय अडथळा लांबला, तर नासाचे चंद्र अन्वेषण, मंगळ मोहीम यांसारख्या योजनांवर गंभीर परिणाम होईल. जेव्हा पर्यंत या राजकीय गोंधळावर स्पष्ट तोडगा निघत नाही, तोपर्यंत नासाचे बंद राहणे हे या गोष्टीची साक्ष देत राहील की राजकीय निर्णय थेट विज्ञान आणि अंतराळ संशोधनावर परिणाम करू शकतात. सध्या, नासाचा विशाल कर्मचारीवर्ग फक्त अत्यावश्यक कामासाठी शांतपणे कार्यरत आहे, जेणेकरून अंतराळवीर आणि अंतराळ यानांची सुरक्षा सुनिश्चित केली जाऊ शकेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande