जयपूर , 3 ऑक्टोबर (हिं.स.)। ज्याप्रमाणे भारताने ऑपरेशन सिंदूर १.० दरम्यान संयम बाळगला, त्याचप्रमाणे यावेळी संयम बाळगणार नाही. यावेळी आम्ही पुढील कारवाई करू आणि अशी कारवाई करू की पाकिस्तानला या भूगोलात राहायचे आहे की नाही याचा पुनर्विचार करावा लागेल. असा कठोर इशारा भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला दिला. राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये आज, शुक्रवारी आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते.
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी श्रीगंगानगर जिल्ह्यातील घडसाणा गावातील २२ एमडी येथील सीमावर्ती परिसराचा दौरा केला. त्यांनी या संदर्भात आर्मी आणि बीएसएफच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि आतंकवादाविरुद्ध भारताची तयारी तपासली. कार्यक्रमात बोलताना उपेंद्र द्विवेदी म्हणाले, “ऑपरेशन सिंदूरच्या यशाबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारतीय सैन्य तसेच जनतेला श्रेय दिले. ते म्हणाले की, जेव्हा जेव्हा या देशातील कोणतीही महिला तिच्या कपाळावर सिंदूर लावते तेव्हा तिला ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय सैन्यातील सैनिकांची आठवण येते. यावेळी, दहशतवादाविरुद्ध ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आले, संपूर्ण ऑपरेशनला एकच नाव देण्यात आले, तर याआधी केलेल्या सर्व ऑपरेशन्सना वेगवेगळी नावे होती.”
लष्करप्रमुख म्हणाले, पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जेव्हा भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले तेव्हा संपूर्ण जग भारताच्या मागे उभे राहिले. संपूर्ण जगाने या दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला. ते म्हणाले, भारताने पाकिस्तानमधील नऊ ठिकाणी हल्ला केला, सात लष्कराने आणि दोन हवाई दलाने. पुढे द्विवेदी म्हणाले, भारताने नष्ट केलेल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यांचे पुरावे संपूर्ण जगाला दाखवले आहेत. जर भारताने पुरावे दाखवले नसते तर पाकिस्तानने ते सर्व लपवले असते. यावेळी भारत पूर्णपणे तयार आहे आणि जर देवाची इच्छा असेल तर त्यांना लवकरच ही संधी मिळेल.”उपेंद्र द्विवेदी यांनी या कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूर १.० दरम्यान उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तीन लष्करी अधिकाऱ्यांना विशेष सन्मानित करण्यात आले. बीएसएफच्या १४० व्या बटालियनचे कमांडंट प्रभाकर सिंग, राजपुताना रायफल्सचे मेजर रितेश कुमार आणि हवालदार मोहित गेरा यांना या कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode