
जळगाव , 31 ऑक्टोबर (हिं.स.) : पारोळा तालुक्यातील उंदीरखेडा शिवारातून दिनांक २९ च्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ५२ हजार रुपये किंमतीचे पशुधन चोरून नेल्याची घटना घडली. उंदीरखेडा येथील रहिवासी राजेंद्र काशिनाथ निकम व पंढरीनाथ पाटील (मोंढाळे प्र.उ.) यांची उंदीरखेडा शिवारात शेतामध्ये नेहमीप्रमाणे गुरे बांधलेली होती.रात्री साडेअकरा ला गुरांना चारा पाणी करून ते घरी आले,दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा गुरांकडे गेले असता त्या ठिकाणी त्यांना तीन जर्सी गाई,एक गोरा व म्हशीचे पारडू हे जनावरे दिसुन न आल्याने त्यांना समजले कि आपली जनावरे कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे लक्षात आले. त्यांनी लागलीच आजुबाजुला गुरांची शोधा शोध करूनही गुरे मिळून न आल्याने याबाबत त्यांनी पारोळा पोलिस स्टेशनला फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत अज्ञात चोरां विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पारोळा पोलिस करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर