अदिला नदीवरील एकरुख तलाव आता ‘वर्ल्ड हेरिटेज’च्या यादीत
सोलापूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। सोलापूर-तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगाजवळील एकरुख मध्यम प्रकल्प १८७१ मधील आहे. तब्बल १५४ वर्ष हा जुना एकरूख प्रकल्प आता वर्ल्ड हेरिटज घोषित झाला आहे. भारतातील कृष्णा नदीच्या खोऱ्यातील सीना उप-खोऱ्यात स्थित जागतिक वारसा स
Ekrukh pond on Adela river


सोलापूर, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। सोलापूर-तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगाजवळील एकरुख मध्यम प्रकल्प १८७१ मधील आहे. तब्बल १५४ वर्ष हा जुना एकरूख प्रकल्प आता वर्ल्ड हेरिटज घोषित झाला आहे. भारतातील कृष्णा नदीच्या खोऱ्यातील सीना उप-खोऱ्यात स्थित जागतिक वारसा सिंचन संरचना म्हणजेच एकरुख मध्यम प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय सिंचन आणि निचरा आयोगाने (आयसीआयडी) वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित केले आहे.

ब्रिटिशांनी शेतीच्या पाणीपुरवठ्यासाठी अदिला नदीवर प्रकल्प बांधला. त्याची साठवण क्षमता तीन टीएमसी असून त्यामुळे ११ गावातील १२२९ हेक्टर सिंचनाखाली आले. तलावाची उभारणी, जॅकवेल मजबूत बांधकामाचे उत्तम उदाहरण असून शुद्ध व गोड पाणी या तलावाचे वैशिष्ट्य आहे.

दीड वर्षांपूर्वी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकरुख प्रकल्पाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता मोहन जाधवर यांनी एकरुख प्रकल्प वर्ल्ड हेरिटजमध्ये समाविष्ठ करावा, असा प्रस्ताव सादर केला होता. तो प्रस्ताव मान्य झाला असून एकरुख तलावाला ‘आयसीआयडी’कडून वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा घोषित झाला. त्याचे प्रमाणपत्र सेंट्रल वॉटर कमिशनने स्वीकारले आणि ते सोलापूरच्या जलसंपदा विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. यापूर्वी डिसेंबर २०२० मध्ये महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४९० वर्षे जुना धामापूर तलाव वर्ल्ड हेरिटजमध्ये समाविष्ठ झाला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande