नाशिकहून दिल्लीसाठी इंडिगोची दुसरी थेट विमानसेवा होणार सुरू
नाशिक, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। नाशिकहून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, सातत्याने होणाऱ्या मागणीचा विचार करून इंडिगो एअरलाइन्सकडून दुसरी नॉनस्टॉप विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. २६ ऑक्टोबर २०२५ पासून सेवा सुरू होणार असून, यामुळे
indigo


नाशिक, 4 ऑक्टोबर (हिं.स.)। नाशिकहून दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, सातत्याने होणाऱ्या मागणीचा विचार करून इंडिगो एअरलाइन्सकडून दुसरी नॉनस्टॉप विमानसेवा सुरू करण्यात आली आहे. २६ ऑक्टोबर २०२५ पासून सेवा सुरू होणार असून, यामुळे नाशिककरांसाठी आता दिल्लीला जाणे आणखी सोयीचे होणार आहे.

दिल्ली गाठण्यासाठी इंडिगोची सुरू असलेल्या सेवेसोबत आता त्यांची दुसरी सेवा उपलब्ध झाल्याने प्रवाशांना सकाळ-संध्याकाळ दिल्लीसाठी थेट विमान मिळणार आहे. विशेषतः व्यावसायिक, विद्यार्थी व नाशिक नजीकच्या जिल्ह्यांतील प्रवाशांसाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

दिल्लीसाठी नाशिकहून सतत विमानसेवेची मागणी होत होती. व्यावसायिक, पर्यटन व शासकीय दौऱ्याच्या दृष्टीने नाशिक-दिल्ली या मार्गाला मोठे महत्त्व आहे. आता दररोज दोन थेट विमानांची सुविधा मिळाल्याने नाशिककरांची दिल्ली यात्रा अधिक सुलभहोणार आहे. यासोबतच विमानासोबतच कार्गो सेवाही तितक्याच सक्षमपणे वापरली जात असल्याने विमानसेवेला मान्यता देण्यात आली आहे.

नवीन विमानसेवा

फ्लाइट क्रमांक ६ए ६६३५ दिल्ली नाशिक (१८.२५ - २०.२०) फ्लाइट क्रमांक ६ए ६६३६ नाशिक दिल्ली (२०.५० २२.३५) ही सेवा एअरबस अ ३२० विमानावर संचलित होणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande