अजितदादांच्या नाराजीनंतर पुणे महापालिकेच्या प्रभाग रचनेत बदल
पुणे, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची अंतिम प्रभागरचना नुकतीच जाहीर करण्यात आली. महापालिकेने तयार केलेल्या प्रारूप प्रभागरचनेतील काही प्रभागांमध्ये बदल करून अंतिम प्रभागरचना करण्यात आली. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस
ajit pawar


पुणे, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठीची अंतिम प्रभागरचना नुकतीच जाहीर करण्यात आली. महापालिकेने तयार केलेल्या प्रारूप प्रभागरचनेतील काही प्रभागांमध्ये बदल करून अंतिम प्रभागरचना करण्यात आली. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार ) पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या पदाधिकाऱ्यांची ताकद असलेल्या काही प्रभागांमध्ये बदल करून पवार यांना खुश करण्याचा प्रयत्न भाजपकडून करण्यात आला आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद असलेल्या हडपसर, खडकवासला आणि वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांतील प्रभागांमध्ये काही बदल करून दिलासा देण्यात आला आहे. राज्यात महायुतीमध्ये सत्ताधारी असलेल्या आणि भाजपचे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार), शिवसेना (शिंदे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रभागरचना केल्याचा आरोप करण्यात आला होता.

--------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande