अकोला, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अकोला महानगराचा श्री शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सव आज गोरक्षण मार्ग स्थित माधव नगर येथील एकविरा मैदान येथे पार पडला. या उत्सवाला स्थानिक उद्योजक शिवप्रकाश रुहाटिया प्रमुख अतिथी तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हे शताद्बी वर्ष असून, स्वयंसेवकांमध्ये विशेष उत्साह आहे. या उत्सवात प्रमुख वक्ते असलेले सुनील आंबेकर १९९० पासून प्रचारक म्हणून कार्यरत आहेत. ते अखिल भारतीय प्रचारप्रमुख म्हणून कार्यरत असून त्यांचे केंद्र भाग्यनगर अर्थात हैदराबाद आहे. तर प्रमुख अतिथी शिवप्रकाश रुहाटिया हे स्थानिक उद्योजक आहेत. आज सायंकाळी होमिओपॅथी कॉलेज मैदान अर्थात गौरक्षण मार्गावरील एकविरा मैदानावर संपन्न झालेल्या या उत्सवाला नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. यावेळी एकविरा मैदान येथून स्वयंसेवकांच्या पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले होते . हे संचलन चैतन्य सोसायटी, निवारा कॉलनी, माधव नगर, गोरक्षण रोड, देवी प्लाझा, गणेश नगर चौक, सहकार नगर, गोरक्षण रोड मार्गे एकविरा मैदान येथे संचलनाचा समारोप करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे