हभप गोपाळबाबा उरळकर यांचे आयुष्य प्रत्येकाला प्रेरणा देणारे - आकाश फुंडकर
अकोला, 5 ऑक्टोबर (हिं.स.)। वारकरी संप्रदायाची शिकवण सर्वदूर पोहचवण्यासाठी कार्य करणाऱ्या ह.भ.प गोपाळबाबा उरळकर यांचे आयुष्य प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी केले. बा
P


अकोला, 5 ऑक्टोबर (हिं.स.)।

वारकरी संप्रदायाची शिकवण सर्वदूर पोहचवण्यासाठी कार्य करणाऱ्या ह.भ.प गोपाळबाबा उरळकर यांचे आयुष्य प्रत्येकाला प्रेरणा देणारे आहे, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी केले.

बाळापुर तालुक्यातील उरळ बू.येथे ह.भ.प गोपाळबाबा उरळकर यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय आयुष (स्वतंत्र पदभार), सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, खासदार अनुप धोत्रे, ह.भ.प तुकाराम महाराज सखारामपूरकर,

आमदार चैनसुख संचेती, आ.डॉ.संजय कुटे, आ.नितीन देशमुख, माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांच्यासह वारकरी संप्रदायातील संत मंडळी उपस्थित होती.

पालकमंत्री श्री.फुंडकर म्हणाले की ह.भ.प गोपाळबाबा उरळकर यांनी आयुष्यभर सेवा, समर्पणाचा संदेश दिला. साधी राहणी व उच्च विचारसरणी त्यांचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून अनेकांसाठी ते आदर्श आहेत.त्यांच्या माध्यमातून असेच उत्तरोत्तर कार्य होत राहो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.

केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की,अध्यात्माच्या माध्यमातून अखंड कार्य करणाऱ्या संत मंडळींचे कायम समाजावर उपकार आहेत. मितभाषी असणाऱ्या ह.भ.प गोपाळबाबा उरळकर यांचे ज्ञान संस्कारक्षम पिढी घडवण्यासाठी खरी प्रेरणा ठरेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande